Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांशी योजनेपैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची योजना आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाले असून तेव्हापासून प्रत्येक महिलांच्या बँक खात्यामध्ये नियमितपणे दरमहा दीड हजार रुपये याप्रमाणे पैसे जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण बारा हप्ते यशस्वीरित्या महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. ज्यात जुलै 2024 ते जून 2025 या कालावधी मधील सर्व हप्त्यांचा समावेश आहे.
जून महिन्याचा हप्ता जमा
जून 2025 च्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. म्हणजेच जून महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक असलेल्या 3600 कोटी रुपयाचा निधी जून महिन्याच्या आखेरीस वित्त विभागाने मंजूर केला होता. यामुळे अनेक महिलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असून त्यांच्या आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत मिळाले आहे. मात्र काही महिलांकडून त्यांच्या खात्यात जून चा हप्ता जमा न झाल्याच्या तक्रारी येत आहेत.
पात्र महिलांना जुलै च्या हत्या सोबत डबल पैसे
ज्या महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशा महिलांना जुलै च्या हप्त्यासोबत जून आणि जुलै अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यात एकूण तीन हजार रुपये जमा होऊ शकतात. मात्र याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सर्वांचे लक्ष या दिशेने लागले आहे. ही घोषणा झाल्यास अनेक महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.
हे पण वाचा| सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण! जाणून घ्या आजचे ताजे दर..
जुलैचा हप्ता कधी मिळणार?
जूनचा हफ्ता जुलै च्या पहिल्या आठवड्यात मिळाल्यानंतर आता महिलांना जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. काही अहवालानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा हप्ता जुलै च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्या पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. Ladki Bahin Yojana Scheme
दरम्यान विरोधकांकडून ही योजना बंद होणार असल्याचे दावे केले जात असताना भाजपाचे आमदार राम कदम यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की विरोधक म्हणत होते की योजना सुरूच होणार नाही पण आम्ही ती सुरू करून दाखवली आणि करोडो महिलांना आर्थिक लाभ देखील दिला. आता ते म्हणतात की ही योजना दोन महिन्यात बंद होईल तीन महिन्यात बंद होईल. मी त्यांना सांगू इच्छितो की ही योजना आता कधीच बंद होणार नाही उलट यामध्ये कशी आणखीन वाढ होईल याकडे आमचे सरकार लक्ष केंद्रित करीत आहे. कदम यांच्या या वक्तव्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत जमा केली जाते. आतापर्यंत 12 हप्ते एकूण 18000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असून, जुलै महिन्याच्या हप्त्याची महिलांना आतुरतेने प्रतीक्षा आहे. योजना खऱ्या अर्थाने महिलांच्या आत्मनिर्भरते साठी खूप महत्त्वाची ठरत आहे.
1 thought on “Ladki Bahin Yojana Scheme: लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! या महिलांना मिळणार 3,000 रुपये?”