Gold Price Today: सोना आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज बुधवार 15 जुलै 2025 रोजी सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये लक्षणीय घसरण झाल्याचे दिसत आहे. तुम्ही देखील सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी बनू शकते. या लेखामध्ये आपण आजचे सोन्याचे दर काय आहेत हे जाणून घेणार आहोत. तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या किमतीत झालेला बदल सोन्याच्या दरावर मोठा प्रभाव पडतो. 24 कॅरेट सोने प्रति तोळा 130 रुपयांनी स्वस्त झाले असून दहा तोळ्यावर तब्बल एक हजार पेक्षा जास्त बचत होत आहे. चांदीच्या किमतीत देखील आज मोठी घट झाली आहे. सध्या सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये बाजारात होणाऱ्या चढउतार सोने खरेदी करावा का थांबावे असा संभ्रम निर्माण करत आहे. Gold Price Today
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलामुळे काही शहरांमध्ये सोन्याचे दर स्थिर राहिले असले तरी काही ठिकाणी त्यामध्ये वाढ ही झाल्याचे दिसत आहे. आज सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 99760 रुपये एवढा आहे. जो मंगळवारी 99890 रुपये प्रति थोडा एवढा होता. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचा भाव 91440 रुपये तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 74820 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. चांदीच्या दराबद्दल बोलायचं झाल्यास प्रति किलो चांदीचा भाव एक लाख 14 हजार 900 रुपये एवढा आहे.
हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हिरव्या मिरचीच्या किमतीत मोठी वाढ; वाचा सविस्तर
तुमच्या शहरानुसार सोन्याच्या किमती
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 9910 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे 22 कॅरेट सोन्याचा दर 91,590 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे तर 18 कॅरेट सोन्याचा दर 74940 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकत्ता आणि बेंगलोर या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 99760 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे तर बावीस कॅरेट सोन्याचा दर 91 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे व 18 कॅरेट सोन्याचा दर 74 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
सोन्याचे दर कसे ठरवले जातात?
आजच्या सोन्याचे किमती जाणून घेतल्यानंतर कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोन्याचे दर कसे ठरवतात? सोने आणि चांदीचे दर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीवर अवलंबून असतात. भारतात इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन आणि स्थानिक सराफ बाजाराच्या आधारावर दर जाहीर केले जातात. सोन्या चांदीच्या किमती दररोज बदलतात आणि अनेक घटक त्यासाठी जबाबदार असतात. जागतिक बाजारात जेव्हा अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. अशावेळी सोन्याच्या दारात वाढ दिसून येते. त्याचबरोबर डॉलरचे मूल्य कमी झाले किंवा सोन्याचे दर वाढले आणि रुपया कुंकवत झाला तर सोन्याचे दर वाढतात.
1 thought on “Gold Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण! जाणून घ्या आजचे ताजे दर..”