RBI News | देशभरामध्ये नोटबंदीचा शब्द आला, की 8 नोव्हेंबर 2016 ची आठवण प्रत्येक भारतीय नागरिकांना होते. त्यादिवशी रात्री केंद्र सरकारने 500 आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा अचानक बंद केल्या होत्या यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी धावपळ उडाली. त्याचबरोबर अनावश्य काळामध्ये नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. बँकेमध्ये रांगाच रांगा व्यवहारांमध्ये गोंधळ आणि सामान्य नागरिकांचा संताप सर्वांनी अनुभवला. त्याचवेळी 2000 आणि नव्या पाचशे रुपयांच्या नोटा बाजारात आल्या आणि देशाच्या चलनाचा चेहरा मोहराच बदलला. RBI News
नव्या पाचशे रुपयांच्या नोटा देशभर मध्ये सर्वाधिक प्रमाणात वापरला जात आहेत. ₹2000 रुपयांच्या नोटा आता चलनातून पूर्णपणे बाद झाल्या आहेत. त्यामुळे मोठ्या व्यवहारांमध्ये आणि खरेदी विक्रीमध्ये 500 रुपयांच्या नोटा महत्त्वाच्या ठरले आहेत. मात्र, नुकत्याच होत असल्यामुळे मेसेज मुळे अनेक नागरिकांच्या मनामध्ये सध्या भिती आणि संभ्रम निर्माण झालेला आहे. तो म्हणजे “30 सप्टेंबर 2025 नंतर पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार!”
सोशल मीडियावरती व्हायरल मेसेज चा दावा काय?
सध्या सोशल मीडिया हे मोठ्या प्रमाणामध्ये वायरल होणारे माध्यम बनला आहे. या माध्यमाच्या माध्यमातून वरील मेसेज मध्ये काही महत्त्वाचा दावा करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर 2025 नंतर आरबीआय ₹500 रुपयांच्या नोटा चलनात आणणार नाही. एटीएम मधून 500 ची नोट निघणार नाही. आरबीआय सुरुवातीला 75% ₹500 च्या नोटा बंद करणार आणि नंतर 31 मार्च 2026 पर्यंत आकडा 90% पर्यंत नेणार. देशात फक्त 200 आणि 100 च्या नोटाच उरतील.
या दाव्यांनी संपूर्ण सोशल मीडियावर ते गदारोळ माजवला आहे. WhatsApp, फेसबुक, टेलिग्राम, youtube वर लोक एकामेकांना “,500 रुपयांची नोट साठवू नका”, “पुन्हा नोटबंदी येणार” असा संदेश देण्यात येत आहे.
यामागचं सत्य काय?
आरबीआय कडून किंवा केंद्र सरकारकडून 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भात सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आतापर्यंत आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा कोणतेही प्रेस नोट मध्ये पाचशे रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे व्हायरल मेसेज मधील सगळी माहिती खोटी आणि चुकीची आहे.
सरकार किंवा आरबीआय जर कधी अशा निर्णयावर विचार करत असेल तर त्याआधी व्यापक स्तरावर घोषणा केली जाते. जसं ₹2000 च्या नोटा बात करताना आधी RBI ने प्रेस नोट जाहीर केली, नंतर चार महिन्यांच्या कालावधी दिला आणि शेवटी नोटा त्यांना मधून बंद करण्यात आल्या.
सध्या सोशल मीडियावरती अशी चुकीची माहिती अतिशय वेगाने पसरते. नागरिकांमध्ये नोटबंदीचा जुना धोका पुन्हा उभा राहतो की काय अशी भीती आहे. यामुळे अशा मेसेज ना बळी न पडता शासनाच्या घोषणाकडे नागरिकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. असे मेसेज ना फॉरवर्ड करू नका त्यातील सत्यता तपासा आणि जिथल्या तिथेच मेसेज डिलीट करा.
आरबीआय ने पाचशे रुपयांच्या नोटावर कोणतीही बंदी घालण्याचा विचार केलेला नाही. उलट सध्या देशात सर्वाधिक प्रमाणात पाचशेच्या नोटा वापरल्या जातात. शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा सर्वसामान्य खरेदीसाठी वापरले जात असल्या तरी पाचशेच्या नोटा मोठ्या व्यवहारांसाठी आवश्यक आहेत. यामध्ये स्पष्ट होतं की हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे याला आपण बळी पडू नाही.
हे पण वाचा | मोठी बातमी! ₹500 रुपयाची नोट होणार बंद? वाचा सविस्तर माहिती