Chillies Market : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हिरव्या मिरचीच्या किमतीत मोठी वाढ; वाचा सविस्तर


Chillies Market: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. हिरव्या मिरचीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. सध्या हिरव्या मिरचीचे दर 70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहेत. मात्र व्यापाऱ्यांनी पुढच्या महिन्यात आवक वाढल्यास दरात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हिरव्या मिरचीचे उत्पादन अधिक असून भावही चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये हिरव्या मिरचीची उन्हाळी लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. आता ही मिरची तोडणीसाठी आली असून सध्या काळी मिरचीला 70 रुपये प्रति किलो दर मिळत आहे तर ज्वेलरी जातीला 65 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.

यंदा हिरव्या मिरचीचे उत्पादन जास्त प्रमाणात असूनही चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र पुढील आठवड्यात आवक वाढल्यास भावा आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना मिरचीची विक्री योग्य वेळेत, योग्य ते नियोजन करून करावी असा सल्ला दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मिरचीच्या काही शेतामध्ये रोगराई वाढली होती. त्यावर शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागली. मात्र गेल्या आठ दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा मशागतीची कामे हाती घेऊन मिरचीची तोडणी वेगाने सुरू केली आहे.

हे पण वाचा| सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात 1,100 रूपयांची मोठी घसरण; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे भाव

सध्या बाजारपेठेत मिरचीची आवक कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. ज्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जातीची लागवड केली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या तीन-चार तोडण्या पूर्ण झाल्या असून मिरचीला मोठा खर्च जरी आला असला तरी यंदा दर चांगला असल्यामुळे आर्थिक नुकसान होणार नाही अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सध्या बाजारात कमी आवक असल्यामुळे भाव चांगला मिळत आहे पण पुढील आठवड्यात आवक वाढेल तेव्हा दर घटनेची शक्यता आहे. Chillies Market

जातीप्रमाणे मिरच्याचे दर (प्रति किलो)

  • काळी — 70 रुपये
  • ज्वेलरी — 65 रुपये
  • शिमला — 40 रुपये
  • पिकेडोर — 45 ते 65 रुपये
  • बळीराम — 50 रुपये

वरील माहितीच्या आधारे एक गोष्ट स्पष्ट होते की सध्या मिरची उत्पादक शेतकरी चांगले दिवस अनुभवत आहेत. परंतु बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या नियमानुसार दरामध्ये चढउतार होत राहणार. त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यातील आवक वाढीचा अंदाज घेऊन आपल्या उत्पादनाची विक्री योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वरचा ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Chillies Market : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हिरव्या मिरचीच्या किमतीत मोठी वाढ; वाचा सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!