Aadhar Card Update: आधार कार्डच्या नियमात मोठ्या बदल! पॅन कार्ड, रेशन कार्डधारकांना ‘हे’ करावे लागणार..

Aadhar Card Update: मागील काही वर्षापासून आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकांच्या ओळखीचा अत्यंत महत्त्वाचा पुरावा बनले आहे. पण याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. आधार कार्ड हे काही भारतीत्वाचे अथवा नागरिकतत्वाचे प्रमाण नाही. दरम्यान आधार कार्ड बाबत एक महत्त्वाचा बदल झाला आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आधार कार्ड आधारे इतर अनेक कागदपत्रे तयार करता येतात. त्यामुळे यामध्ये अनेक अनैतिक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय वैशिष्ट्ये ओळख प्राधिकरण आधार कार्ड तयार करण्याच्या नियमात बदल झाला आहे. त्यामुळे बांगलादेशी, रोहिंग्या आणि इतर परदेशी नागरिकांची ओळख पटवली जाईल तर मूळ भारतीयांचा डेटा सरकारकडे जमा होईल. Aadhar Card Update

आता आधार तयार करण्यासाठी अधिक कडक नियम

नवीन आधार कार्ड तयार करण्याचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, सरकारने आधार कार्ड च्या नियमात अधिक मजबुती आणण्याचे पाऊल उचलले आहे. नागरिकांचा पासपोर्ट, रेशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड या सर्व डेटा आधार कार्डशी पडताळणी पाहण्यात येणार आहे. त्यासाठी ही सर्व माहिती ऑनलाईन सेव करून ठेवण्यात येणार आहे. त्यांचे इंटरलींक झाल्यानंतर पडताळा झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला आधार कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस कागदपत्रे तयार करून आधार कार्ड तयार करण्याच्या गैरप्रकारांना आळा घालता येईल.

हे पण वाचा| आनंदाची बातमी! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता लवकरच जमा होणार; आली मोठी माहिती समोर..

कागदपत्राची छाननी

UIDAI ने एक नवीन टूलचा वापर सुरू केला आहे. या टूलच्या आधारे आधार कार्ड च्या नवीन नोंदणीसाठीच्या कागदपत्राची बारकाईने छाननी केली जाणार आहे. यामध्ये वाहन परवाना, पॅन कार्ड, मरेगा जॉब कार्ड, विद्युत बिलासारख्या कागदपत्राची तपासणी करण्यात येणार आहे. केवायसी प्रक्रिया आणखीन पारदर्शक पद्धतीने व चांगल्या पद्धतीने केली जाणार आहे.

गेल्या काही वर्षापासून बांगलादेशी आणि रोहिंग्या इतर घुसखोरांच्या वसाहती भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई दिल्ली हैदराबाद आणि इतर अनेक मोठ्या शहरात या लोकांना देश विघातक शक्ती भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी मदत करत आहेत. त्यांचे बोगस जन्म प्रमाणपत्र शाळेचे दाखले बोगस कागदपत्रे तयार करून दिले जात आहेत. त्या आधारे त्यांचे रेशन कार्ड आधार कार्ड तयार करण्यात येत आहेत. त्याद्वारे हे घुसखोर भारतात सोई सुविधा मिळवतात. इथेच देश विघातक कृत्य करत असल्याचे समोर आले आहे या सर्व प्रकरणांना आळा बसवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!