Beneficiary Status: देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. देशातील शेतकरी मोठ्या आतुरतेने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस जमा करण्यात आला होता. यानंतर 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा सर्व शेतकरी आतुरतेने करत आहेत. हा हप्ता जून महिन्यामध्ये मिळण्याची अपेक्षा होती मात्र जुलै महिना सुरू होऊनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा 20 वा हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट नुसार 20वा हप्ता कधी जमा होणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कधी मिळणार 20 वा हप्ता?
मिळालेले माहितीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता 18 जुलै रोजी जमा होण्याची शक्यता आहे. या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार मधील मोतीहरी येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी आनंदाची बातमी देऊ शकतात. मात्र ही फक्त संभाव्य तारीख आहे याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रधानमंत्री परदेशी दौऱ्यावरून परत येतात पुढील हप्त्याची घोषणा केली जाणार आहे. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांना काही आवश्यक तयारी करणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हफ्त्यांमध्ये दिले जातात. या आधीचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला गेला होता यानंतर जून मध्ये पुढील हप्ता मिळणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणामुळे काही शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात तुमची रक्कम अडकणार नाही याची खात्री करण्यासाठी खालील गोष्टी करणे आवश्यक आहेत. Beneficiary Status
हे पण वाचा| महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार! मात्र या तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस होणार..
- ई केवायसी करणे आवश्यक: अनेक शेतकऱ्यांचे पैसे केवळ ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे मिळत नाहीत. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे अनिवार्य आहे.
- भूमी सत्यापन झाले आहे का?: तुमच्याकडे जमीन संदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत का आणि त्यांचे सत्यापन झालेले आहे का याची खात्री करून घ्या.
- बँक तपशील बरोबर आहे का?: तुमच्या बँक खाते क्रमांक आयएफसी कोड यासारखी माहिती व्यवस्थित आणि अचूक नोंदवली आहे का नाही याची खात्री करून घ्या.
- मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे का?: योजने संबंधित सर्व महत्त्वाची माहिती मोबाईलवर येते त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर नोंदणी केलेला आहे का नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे.
ई केवायसी कशी करावी?
- सर्वप्रथम पी एम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जावा.
- होम पेजवर तुम्हाला e–KYC या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा योजनेसाठी नोंदणीकृत आधार नंबर भरा.
- त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी मिळेल.
- त्या ठिकाणी दिलेल्या बॉक्समध्ये तो ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
अगदी या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची ई केवायसी घरबसल्या यशस्वीरित्या पूर्ण करू शकता.
हप्त्याची स्थिती (Beneficiary Status) कशी तपासावी?
- सर्वप्रथम बी एम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर या.
- त्यानंतर होम पेजवर beneficiary status या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमचा आधार नंबर किंवा बँक खाते नंबर टाका.
- यानंतर गेट डाटा या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रीनवर पीएम किसान योजनेची संबंधित तुमच्या हप्त्याचे संपूर्ण स्टेटस दिसेल.
यामुळे तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती लगेच समजेल आणि काही अडचण असल्यास ती दुरुस्ती करण्यास वेळ मिळेल. यामुळे विसाव्या हप्त्याची वाट न पाहता आत्ताच तुमच्या सर्व समस्या तपासून घ्या. कोणतीही आवश्यक गोष्ट अपूर्ण असेल तर जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन लवकरात लवकर आपल्या अर्जातील त्रुटी दूर करा. जेणेकरून तुम्हाला विनाअडथळा योजनेचा लाभ मिळेल.
1 thought on “आनंदाची बातमी! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता लवकरच जमा होणार; आली मोठी माहिती समोर..”