शेत जमिनीची वाटणी कशी करावी ? कायदेशीर प्रक्रिया, नियम आणि अटी वाचा सविस्तर

Agriculture News : आपल्या कुटुंबाची वडिलोपार्जित शेतजमीन असो किंवा स्वतःच्या कष्टातून कमावलेली, ती योग्य पद्धतीने वाटून घेणे अत्यंत महत्त्वाचा असतं. विशेषता शेतीच्या जमिनीच्या वाटणीवरून वाद वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कुटुंबात वाद निर्माण होतो सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांमध्ये पारदर्शक पद्धतीने आणि कायदेशीर मार्गाने वाटणी होणे गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्र सहदेश भारत जमीनवादाची संख्या वाढत असल्याने, जमिनीच्या वाटणीबाबतची माहिती प्रत्येकाने जाणून घेणे अत्यंत गरजेचे झाला आहे. Agriculture News

शेतीच्या जमिनीची वाटणी कधी केली जाते?

जर जमीन वडिलोपार्जित असेल आणि तिचा मालक मरण पावलेला असेल, तर त्या जमिनीची वाटणी कायदेशीर वारसांमध्ये केली जाऊ शकते. मात्र, जर वडील जिवंत असतील आणि त्यांनी वाटणीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसेल, तर त्यांच्या इच्छेविरुद्ध वाटणी करता येत नाही. जर त्यांनी मृत्युपत्र तयार केले नसेल, तर जमीन त्यांच्या पत्नी, मुले, मुली असा कायदेशीर वारसांमध्ये विभागले जाते.Agriculture News

शेतीच्या जमिनीची वाटणीची प्रक्रिया काय आहे?

जमिनीच्या मूळ मालकाचा मृत्यू झाल्यानंतर वारसांनी तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो. जर सर्व वारसांनी संयुक्त मालकी मान्य केली, तर सातबाऱ्यावर सर्वांची नावे एकत्र चढवली जातात. जर प्रत्येक वारसाला स्वतंत्र मालकी हवी असेल, तर खातेफोड करावी लागते. यासाठी सर्व वारसांची संमती आवश्यक आहे. जर कोणी वाटणीस नकार देत असेल, तर न्यायालयात दावा दाखल करावा लागतो आणि तिथून मिळणाऱ्या आदेशावर आधारित वाटणी केली जाते. Agriculture News

वाटणीसाठी लागणारी कागदपत्रे

वारस असल्याचं प्रमाणपत्र, वारस नोंदणीचा अर्ज, जमीन मिळकतीशी संबंधित मूळ कागदपत्रे, मूळ मालकाचा मृत्यू दाखला, संमतीपत्र (जर खातेफोड हवी असेल तर)

वाटणीचा निर्णय आणि अंतिम प्रक्रिया

तहसीलदार किंवा महसूल अधिकाऱ्यांकडून सर्व बाजू ऐकून घेतल्या जातात. यानंतर स्थानिक तलाठी जमिनीचा वाटणी प्रस्ताव तयार करतो. प्रत्येक वारसाचा हक्काचा हिस्सा ठरवला जातो. रस्ता व मूलभूत सुविधा लक्षात घेऊन सीमांकन केलं जातं. अंतिम मंजुरी महसूल विभाग किंवा न्यायालयाकडून दिली जाते.

हे पण वाचा | Tar Kumpan Yojana | शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळणार अनुदान; असा करा लगेच अर्ज

(Disclaimer: वरील माहिती माहितीस्त्रोच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

Leave a Comment

error: Content is protected !!