Gold Price News: मागील अनेक दिवसापासून सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. मात्र आज सोन्याच्या किमतीमध्ये झालेली घसरण पाहता ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर उच्चांक पातळीवर पोहोचले होते. त्यामुळे अनेक ग्राहकांच्या मनामध्ये आपण आता सोने खरेदी करू शकतो का नाही असे चिंता निर्माण झाली होती. मात्र आता सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
सोने चांदीचे दर घसरण्यामागे काय कारण आहे?
सध्या जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये तीव्र चढ-उतार होताना दिसत आहे. अमेरिकेने टॉरीफची मुदत वाढवण्याचा आणि त्यासंबंधीच्या ताज्या घडामोडीचा थेट परिणाम सराफ बाजारावर होताना दिसत आहे. भारतीय वायदा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाल्याचे दिसत आहे. जागतिक बाजारात डॉलरच्या निदर्शनाची मजबुती हे देखील सोन्याच्या दरामागे घसरण होण्याचे मुख्य कारण आहे. डॉलर मजबूत झाल्याने सोन्याचे भाव एका आठवड्याच्या सर्वात पातळीवर पोहोचले आहेत.
स्थिर डॉलर आणि अमेरिकन बॉंड उत्पादनात वाढ झाल्याने सोन्याच्या मागणीवर नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. बुधवारी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याचे दर आणखीन खाली घसरल्याचे समोर आले आहे. मंगळवारी अमेरिकन डॉलर दोन आठवड्याच्या उच्चांक पातळीवर स्थिर झाला, तर दहा वर्षाच्या अमेरिकन ट्रेझरनी नोट्सवरील उत्पन्न तीन आठवड्याच्या उच्चंकी पातळीवर पोहोचले आहे. या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडीचा एकत्रित परिणाम म्हणून सोने-चांदीचे दर खाली आले आहेत.
हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या या योजनेत दरमहा ₹2,600 गुंतवा आणि 60 महिन्यात मिळवा इतका रिटर्न?
आज सोन्या-चांदीचे दर किती आहेत?
आज सोन्याचे दर 260 रुपयांनी घसरून 96 हजार 200 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा आहे. सोन्याचा सर्वकालीन उच्चांक दर 1,01,078 रुपये प्रति 10 ग्राम एवढा होता. सोन्याप्रमाणे चांदीचा दर देखील मोठ्या प्रमाणात घसरला आहे. आज चांदीचा दर 170 रुपयाच्या घसरणीसोबत 1,07,820 रुपये प्रति किलो एवढा आहे. यापूर्वी चांदीचा भाव 1,11,000 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला होता. Gold Price News
भारतीय वायदा बाजारामध्ये जागतिक बाजारातील घडामोडीमुळे सोन्याची दरात घसरण होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव कमी झाला आहे. कॉम्प्लेक्स वर सोन्याच्या वायदयामध्ये सुमारे अर्धा टक्क्यांची घसरण होत असून ते 3300 डॉलर प्रति औंस वर आला आहे. मात्र चांदीचा दर थोडा मजबूत होऊन कॉम्प्लेक्स वर चांदीच्या वायद्यामध्ये किंचित वाढ होऊन 37 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत आहे. सोने चांदीचे दर घसरल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आणि दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी हे सुवर्णसंधी आहे.