Post Office RD Yojana: प्रत्येक जण आपल्या भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो. तुम्ही देखील तुमच्या बचतीतून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. गुंतवणूक करायची तर आहे पण एकत्रित मोठी गुंतवणूक करणे शक्य नाही, तर अशा वेळेस पोस्ट ऑफिस ची रिकरिंग डिपॉझिट योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. ही योजना विशेष अशा लोकांसाठी डिझाईन केली गेली आहे जी दरमहा छोटे रक्कम गुंतवून भविष्यात एक मोठा निधी तयार करू शकतात.
पोस्ट ऑफिस ची आरडी योजना काय आहे?
सर्वसामान्य बँकेच्या आरडी योजनेप्रमाणेच पोस्ट ऑफिस ची आरडी योजना तुम्हाला दर महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करायची संधी देते. सध्या पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेवर 6.7% वार्षिक व्याजदर दिला जातो. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षासाठी असतो. म्हणजेच साठ महिन्यानंतर तुमची गुंतवलेली रक्कम व्याजासह तुम्हाला परत मिळते. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट योजनेला टाईम डिपॉझिट योजना म्हणून ओळखले जाते तर आरडी योजनेला रिकरिंग डिपॉझिट योजना म्हणून ओळखले जाते. या योजनेत नियमितपणे पैसे जमा करावे लागतात.
हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी 275 कोटींची मदत मंजूर! लवकरच खात्यात येणार पैसे? जाणून घ्या सविस्तर
2600 रुपये महिन्याला गुंतवले तर किती रिटर्न मिळेल?
पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत जर तुम्ही दरमहा 2,600 गुंतवले तर साठ महिन्यानंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल याबद्दल जाणून घेऊया. सध्याच्या 6.7% वार्षिक व्याजदराने जर तुम्ही 2600 दरमहा गुंतवले असाल तर 60 महिन्याच्या मॅच्युरिटी नंतर तुम्हाला एकूण 185556 रुपये मिळतील. यामध्ये तुमची गुंतवणूक एक लाख 56 हजार रुपये असेल, म्हणजेच तुम्हाला या योजनेतून 29 हजार 556 रुपये व्याज अतिरिक्त रिटर्न्स मिळेल. Post Office RD Yojana
ही योजना कोणासाठी फायद्याची?
- पोस्ट ऑफिस ची आरडी योजना ज्यांना दरमहा बचत करण्यासाठी सवय आहे पण मोठी एकंदरीत गुंतवणूक करणे शक्य नाही त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची आहे.
- पोस्ट ऑफिस योजनेमध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित मानले जातात कारण त्या सरकारी पाठिंब्याने चालवल्या जातात.
- शेअर बाजारातील चढउतारापासून दूर राहून निश्चित परतावा मिळवायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.
जर तुम्ही देखील सुरक्षित आणि सुरक्षित परतावासाठी नियमितपणे बचत करू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत दर महिन्याला थोडी रक्कम जमा करून एकत्रित मोठा परतावा मिळू शकतात. पोस्ट ऑफिस च्या सर्व योजना एकदम सुरक्षित असल्यामुळे यामध्ये तुमच्या सोबत कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची हमी मिळते. भविष्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर लगेच पोस्ट ऑफिस मध्ये भेट देऊन आरडी योजनेमध्ये खाते उघडून आजपासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात करा.