Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मिळाला नाही जून महिन्याचा हप्ता, जाणून घ्या कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचा आता जमा होण्यास सुरुवात झालेली असून अनेक महिलांच्या खात्यात जून महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. मात्र काही महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत. ज्यामुळे त्यांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. मात्र काही महिलांना पैसे न मिळाल्या मागे काही विशिष्ट कारण आहेत. नेमकं कोणती कारण आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया.

पैसे न मिळण्याचे प्रमुख कारणे

जर तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर याचा एक प्रमुख अर्थ असा असू शकतो की तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरला आहात. शासनाने यापूर्वीच स्पष्ट सांगितले होते की, जे अर्जदार योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. त्यामुळे सध्या सर्व अर्जाची पुन्हा तपासणी सुरू आहे. यामध्ये ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्या महिला या योजनेतून अपात्र केल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळेच काही महिलांना या महिन्यात हप्ता मिळाला नाही. ही पडताळणी प्रक्रिया सुनिश्चित करते की योजनेचा लाभ केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच मिळावा.

हे पण वाचा| तुमचेही नाव लाडकी बहीण योजनेतून काढून टाकलंय का? यादीत तुमचं नाव कसं तपासणार?

तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे का नाही कसे तपासावे?

तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे का नाही खूप सोपे आहे. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन पद्धतीने तपासू शकतात. Ladki Bahin Yojana

ऑनलाइन पद्धत:

  • तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲप वर जा तिथे तुम्हाला तुमचे बँक बॅलन्स तपासावे लागेल.
  • ट्रांजेक्शन हिस्ट्री किंवा पासबुक विभागात जाऊन तुम्हाला तुमच्या खात्यात नवीन व्यवहार झाला आहे का नाही हे दिसेल.
  • काही बँका मिस कॉल बँकिंग सुविधा देतात तुम्ही तुमच्या बँकेच्या विशिष्ट नंबर वर मिस कॉल देऊन बॅलन्स ची माहिती मिळवू शकतात.

ऑफलाइन पद्धत:

  • तुम्ही तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन तुमच्या खात्यातील बॅलन्स आणि व्यवहाराची माहिती घेऊ शकता.
  • बँकेच्या एटीएम मध्ये जाऊनही तुम्ही बॅलन्स चेक करू शकता.

जर तुम्हाला अजूनही तुमच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झाल्याचे दिसले नसेल, तर तुम्हाला खात्री होईल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही. तुम्ही तुमच्या स्थानिक प्रशासकीय किंवा योजनेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून याबद्दल माहिती जन्म देऊ शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मिळाला नाही जून महिन्याचा हप्ता, जाणून घ्या कारण काय?”

Leave a Comment

error: Content is protected !!