UPI Cash Deposit: बँकेच्या रांगेत उभे राहून रोख रक्कम जमा करायची म्हणजे डोक्याला मोठा ताप. लांब रांग, वेळेचा अभाव, बँकेत जाऊन पैसे जमा करणे या कामाला वैतागला असाल तर तुमच्यासाठी बातमी खूप महत्त्वाची आहे. भारताच्या डिजिटल क्रांतीने आणखीन एक मोठी मजल मारली आहे. लवकरच तुम्ही आता यूपीआय वापरून थेट एटीएम मधून रोख रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता. तुम्ही रोज वापरत असलेल्या पेटीएम, फोन पे किंवा गुगल पे ॲप वरून तुम्ही तुमचे कॅश पैसे बँक खात्यात जमा करू शकता.
ही नवीन सेवा खूपच सोपे आणि जलद असणार आहे. समजा, तुम्ही एखाद्या एटीएम किंवा कॅश रिसायकल मशीन (CDM) समोर उभे आहात. तिथे तुम्हाला यूपीआय कॅश डिपॉझिट हा पर्याय निवडायचा आहे. पर्याय निवडताच स्क्रीनवर एक किंवा कोड दिसेल हा किंवा कोड तुम्हाला तुमच्या फोन पे वरच्या यूपीआय अँप ने स्कॅन करायचा आहे. UPI Cash Deposit
हे पण वाचा| आज कांद्याच्या दरात वाढ झाली का घसरण? पहा आजचे कांदा बाजार भाव..
क्यू आर कोड स्कॅन झाल्यावर तुम्ही मशीन मध्ये तुमची रोख रक्कम ठेवायची आहे. एकदा मशीन ने रक्कम ओळखली की ती रक्कम तुम्हाला तुमच्या यूपीआय मध्ये दिसेल. आता फक्त तुम्हाला कुठल्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत ते निवडायचे आहे आणि तुमचा यूपीआय पिन टाकायचा आहे. तुमचा व्यवहार पूर्ण झाला की लगेच बँक खात्यात पैसे जमा होतील. त्यानंतर तुम्हाला पैसे जमा झाल्याची पावती देखील मिळेल.
ही सुविधा केवळ ग्राहकांच्या वेळेची बचत करणार नाही तर संपूर्ण बँकिंग प्रणालीसाठी एक स्मार्ट आणि दूरदृष्टीचा पुढाकार आहे. ज्यांना बँकेच्या कामासाठी वेळ काढणे शक्य होत नाही ज्यांच्या घराजवळ बँक शाखा नाही किंवा ज्यांना झटपट व्यवहार करायचा आहे त्यांच्यासाठी ही सेवा खूप फायद्याची ठरणार आहे. आज भारताच्या डिजिटल व्यवहारात यूपीआय ने मोठी क्रांती केली आहे. एप्रिल 2016 रोजी सुरू झालेले यूपीआय द्वारे आज भारतात दर तासाला 2.5 कोटी पेक्षा जास्त व्यवहार होतात. ही प्रणाली केवळ भारतातच नाही तर फ्रान्स भूतान श्रीलंका आणि मॉरिशस सारख्या देशांमध्ये वापरली जात आहे. अनेक देशांशी चर्चा सुरू आहे या यूपीएच्या मदतीने आता रोख रक्कम जमा करण्याची प्रक्रिया खूप सोपी होणार आहे.
1 thought on “आता कॅश डिपॉजिटसाठी बँकेत जायची गरज नाही, ATM मधून UPI ने जमा करता येणार पैसे; जाणून घ्या संपूर्ण”