महाराष्ट्रात तयार होणार नवीन 22 जिल्हे? कोणते नवीन जिल्हे तयार होणार वाचा सविस्तर माहिती

Maharashtra New Districts | गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांमधून नवीन मागणी पुढे येत आहे महाराष्ट्र मध्ये नवीन जिल्हे कधी होणार? कधी सोशल मीडिया वरती याचा ट्रेंड सुरू होतो तर कधी नेते आपल्या भाषणांमधून जिल्ह्यांची मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक दिवसांपासून लोकांची मागणी वाढत चालली आहे अगदी प्रत्येक जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला बसलेल्या गावकऱ्यांचे एकच सवल आहे सरकार आमचं म्हणणं कधी ऐकणार?

कारण गावाकडून जिल्हा मुख्यालय पर्यंत जायला वेळ लागतो, पैसे लागतात, आणि काम पूर्ण व्हायची तर खात्री नाही. मग नवे जिल्हे झाले तर प्रशासकीय काम गावापासून जवळ होतील आणि लोकांची धावपळ कमी होईल हे सगळं साधं गणित सरकारला कळत नाही का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामधून उपस्थित केला जात आहे. Maharashtra New Districts

याच प्रश्नावरती अनेक दिवसापासून सोशल मीडियावरती एक ट्रेन सुरवत आहे तो म्हणजे सरकार लवकरच नवीन 22 जिल्हे निर्माण करणार पण हा प्रस्ताव अजून धुळखात पडूनच आहे. फाईल कुठल्या कपाटात अडकली, हे कोणालाच माहीत नाही. पुणे गोष्ट नक्की आहे महाराष्ट्रात आजपर्यंत एकच नवीन जिल्हा अधिकृतपणे तयार झाला आहे तो म्हणजे पालघर जिल्हा.

महाराष्ट्र मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती एक ऑगस्ट 2014 रोजी झाली पूर्वी तो ठाणे जिल्ह्याचा एक भाग होता. वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रशासकीय गैरसोय आणि लोकांची मागणी यामुळे ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्या पालघर जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. आज पालघर हा महाराष्ट्राचा 36 वा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

पालघर हा कोकण विभागाचे एक भाग असून मुंबईपासून अवघ्या 87 किमी अंतरावर आहे. विरार पासून फक्त 35 किमी आणि अहमदाबाद मार्गापासून अवघे 24 किमी दूर आहे. हे शहर मुंबई मेट्रोपॅलेटन रिझन मध्ये येतं आणि त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे.

1942 साली भारत छोडो आंदोलन सुरू झालं होतं तेव्हा पालघर जिल्ह्याने आपली छाप पक्की उमटवली होती. चलो जाओ चळवळीत इथल्या लोकांनी ब्रिटिश विरोधात मोठा लढा दिला होता. याच कारणामुळे पालघर जिल्ह्याचा इतिहास देखील लढाव्या भूमिकेचा आहे.

मंग नवे जिल्हे कधी होणार?

प्रश्न अजूनही तसाच आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या जिल्ह्यांची विभाजन करून लवकरात लवकर नवे जिल्हे करावेत जनतेची मागणी आहे. पण सरकारचा निर्णय आणि हालचाल अजूनही डीम आहे. गावागावातून विचार होतोय आमच्या भागाचा जिल्हा कधी होणार? शेतकरी, शाळकरी, महिला, आणि वयोवृद्ध नागरिक रोज तालुक्याचा नाक्यानंतर जिल्ह्याच्या दारापर्यंत जाण्याची कसरत आहे. नवीन जिल्हे कधी होणाऱ याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!