आज कांद्याच्या दरात वाढ झाली का घसरण? पहा आजचे कांदा बाजार भाव..

Onion Price: महाराष्ट्रातील कांदा बाजारात सध्या मोठा चढ-उतार होत आहे. आज सात जुलै 2025 रोजी राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे दर वाढले का कमी झाले? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये एकूण 90 हजार 816 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यामध्ये आवक झाली आहे. एकीकडे काही बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी दुसरीकडे लालसगाव आणि पिंपळगाव यासारख्या प्रमुख बाजारामध्ये कांद्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्याची चित्र दिसत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता वावरत असल्याचे दिसत आहे.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी लालसगाव बाजार समिती नेहमीच एक महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिली आहे. आज लालसगाव बाजारात सरासरी 1470 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. ही किंमत मागील काही दिवसाच्या तुलनेत खूप कमी आहे. नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची पन्नास हजार क्विंटल आवक झाली असताना वाढलेल्या आवकचा परिणाम दरावर झाल्याचा दिसत आहे. Onion Price

याचप्रमाणे पिंपळगाव बसवंत बाजारात देखील उन्हाळी कांद्याचे दर घसरले आहेत. या ठिकाणी सरासरी 1425 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. पिंपळगाव सुईखेडा बाजारातही 1250 रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा व मोठे पाणी फिरण्याचे चित्र दिसत आहे. कांद्याला मिळणाऱ्या या कमी दरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट निर्माण झाली आहे. यामुळे उत्पादन खर्च देखील निघणं कठीण झालं आहे. Onion Price

केवळ लालसगाव आणि पिंपळगावच नाहीतर राज्यातील इतर बाजारामध्ये कांद्याच्या दरात मोठा चढउतार होताना दिसत आहे. सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. याच प्रमाणे येवला बाजार समितीमध्ये सरासरी 1250 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. मालेगाव बाजारात सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. कळवण बाजारात 1351 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मनमाड बाजारात 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. यंदा कांद्याच्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती मात्र उत्पादन खर्चाच्या तुलनेत हे दर शेतकऱ्यांना विचारात पाडणारे आहेत.

पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर पुणे पिंपरी बाजारात मात्र दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर मिळाला आहे. पुणे खडकी आणि पुणे मोशी सारख्या बाजारामध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याचे दिसत आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये कर्जत बाजारात फक्त 800 रुपये इतका दर मिळाला आहे. मंगळवेढा बाजारात १७५० रुपये प्रतिक्विंटल तर नागपूर बाजारात लाल कांद्याला 1450 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. हिंगणा बाजारात लाल कांद्याला 2066 रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा: सोन्याच्या भावात मोठी घसरण! आज 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती..

पहा आजचे कांदा बाजार भाव:

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमीदरजास्तीत जास्तदरसर्वसाधारणदर
07/07/2025
कोल्हापूर265050021001200
जालना8702001600700
अकोला20860018001400
छत्रपती संभाजीनगर9143001600950
चंद्रपूर – गंजवड361150020001800
मुंबई – कांदा बटाटा मार्केट11354110019001500
विटा40150020001750
सातारा122100020001500
कराडहालवा3950014001400
सोलापूरलाल975210022001200
नागपूरलाल200070017001450
हिंगणालाल4200022002066
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकल22060022001400
पुणेलोकल505260018001200
पुणे- खडकीलोकल570013001000
पुणे -पिंपरीलोकल1200020002000
पुणे-मोशीलोकल4134001500950
कर्जत (अहमहदनगर)लोकल228001200800
मंगळवेढालोकल8131020101750
बारामती-जळोचीनं. १35340020001400
शेवगावनं. १590130018001450
शेवगावनं. २6107001200950
शेवगावनं. ३424300600450
नागपूरपांढरा108060016001350
येवलाउन्हाळी300038215611250
येवला -आंदरसूलउन्हाळी200060014551300
मालेगाव-मुंगसेउन्हाळी1200040018401400
सिन्नर – नायगावउन्हाळी39120015001375
राहूरी -वांबोरीउन्हाळी293510018001200
कळवणउन्हाळी1490050021001351
मनमाडउन्हाळी60030016971500
पिंपळगाव बसवंतउन्हाळी1440040019601425
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी342570018001250

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “आज कांद्याच्या दरात वाढ झाली का घसरण? पहा आजचे कांदा बाजार भाव..”

Leave a Comment

error: Content is protected !!