Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही हे कसे तपासायचे याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल किंवा मागील काही महिन्यापासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळत नसेल तर लगेच तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का नाही तपासून घ्या.
काय आहे लाडकी बहीण योजना?
महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी लाडके बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र मोहिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एका वर्षाला 18000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत जुलै 2024 पासून आतापर्यंत लाभ देण्यात आला आहे. या योजनेचा राज्यातील करोडो महिलांना मोठा फायदा मिळाला आहे. अनेक महिला या योजनेच्या मदतीने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. तर अनेक गोरगरीब महिलांना त्यांच्या घरातील राशन पाणी भागवण्यासाठी या योजनेच्या पैशाचा मोठा हातभार लागत आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एक वर्षात 12 हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी 30 जून 2025 रोजी सरकारने 3600 कोटी रुपयांचा निधी वितरणासाठी मंजूर केला असल्याची माहिती दिली होती. या योजनेला एक वर्ष पूर्ण होत असताना काही महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झाला नसल्याची तक्रार समोर येत आहे. यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सरकार सध्या अपात्र लाभार्थी महिलांची छाननी करत आहे. Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 24 महिने 1 लाख रुपये गुंतवले तर किती नफा मिळेल?
लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती तेव्हा विधानसभा निवडणूक जवळ आले असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात अनेक अपात्र महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळाला. मात्र काही अपात्र महिलांनी चुकीची कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेतला होता. आता सरकार अशा अपात्र महिलांना या योजनेतून वगळत आहे. नुकतच सरकारी कर्मचारी असताना या योजनेचा लाभ येणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर सर्वात आधी तुमचं नाव या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आहे का नाही याची खात्री करून घ्या.
यादीत नाव कसे तपासावे?
- सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- त्यानंतर वेबसाईटवर अंतिम यादी किंवा तत्सम विभाग शोधा.
- तेथे तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि दिलेला कॅप्चर कोड टाका.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करा.
- ओटीपी टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का नाही दिसेल.
- जर या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता लवकरच मिळेल आणि पुढील हप्तेही नियमितपणे मिळतील. मात्र जर तुमचे नाव या यादीत नसेल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात आले आहे असे समजा.
जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता जुलैचा हप्ता ऑक्टोबर मध्ये मिळणार का असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. मात्र मीडिया रिपोर्टनुसार जुलै महिन्याचा हप्ता जुलै महिन्यातच जमा होण्याची शक्यता आहे या महिन्याचा तिसऱ्या किंवा चौथ्या हप्त्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात हा हप्ता जमावण्याची शक्यता आहे. ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रित मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही त्यामुळे जुलै चा तेरावा हप्ता याच महिन्यात मिळणार की पुढील महिन्यात मिळणार? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
1 thought on “तुमचेही नाव लाडकी बहीण योजनेतून काढून टाकलंय का? यादीत तुमचं नाव कसं तपासणार?”