Post Office Time Deposite Yojana: तुम्ही देखील सुरक्षित गुंतवणूक करण्या शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना तुमच्या फायद्याच्या ठरू शकतात. पोस्ट ऑफिसच्या 24 महिन्याच्या एफडी योजनेत एक लाख रुपयाचे गुंतवणूक केल्यास तुम्हाला मॅच्युरिटी नंतर एकूण किती रुपये मिळतील याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत जिथे अनेक बँकांनी आपल्या एफडी व्याजदरात कपात केली आहे तिथे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेमध्ये आकर्षक व्याजदर मिळत आहे.
भारतीय रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आणि एचडीएफसी सारख्या बँकेच्या प्रमुख एफ डी योजनेचा व्याजदर कमी झाला आहे. मात्र पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेचा व्याजदर आजही आहे तसा स्थिर आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना एक सुरक्षित आणि चांगला परतावा मिळण्याची संधी निर्माण होते. या योजनेमध्ये जर तुम्ही 24 महिन्यासाठी एक लाख रुपयाचे गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटी नंतर एकूण 1, 07,186 मिळतील. यामध्ये तुमच्या मूळ गुंतवणुकीवर 7,186 रुपये व्याज मिळेल.
पोस्ट ऑफिस एफडी योजना कशी काम करते?
पोस्ट ऑफिस ची टाईम डिपॉझिट योजना ही साधारणपणे बँकेच्या एफडी योजनेसारखेच काम करते. म्हणूनच याला पोस्टाची एफडी असेही म्हटले जाते ही योजना वेगवेगळ्या कालावधीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. एक वर्षाच्या एफडी योजनेवर 6.9% व्याजदर मिळतो. दोन वर्षाच्या एफडी योजनेवर सात टक्के व्याजदर मिळतो. तीन वर्षाच्या एफडी योजनेवर 7.10% व्याजदर मिळतो. पाच वर्षाच्या एफडी योजनेवर 7.50% व्याजदर मिळतो. Post Office Time Deposite Yojana
हे पण वाचा | एक लिटर पेट्रोलवर पंप मालकाला किती पैसे मिळतात? जाणून घ्या संपूर्ण हिशोब
बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याजदर दिला जातो तसा पोस्ट ऑफिसच्या या योजनेत देखील जेष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर मिळतो. तरीही अनेक बँकाच्या तुलनेत पोस्ट ऑफिसचे व्याजदर चांगले असल्याने ज्येष्ठ नागरिका आणि महिला वर्गांसाठी या योजनेत विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्टात केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवल्यानंतर पूर्णपणे सुरक्षित राहतात.
24 महिन्याच्या एफडी मध्ये किती व्याजदर मिळेल?
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सात टक्के व्याजदर मिळेल. याचा अर्थ असा की जर तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर 24 महिन्यानंतर तुम्हाला एक लाख 7 हजार 180 रुपये एकत्रित मिळतील. म्हणजेच यामध्ये तुम्ही गुंतवलेले एक लाख रुपये आणि तुम्हाला यावर मिळालेला नफा 7186 रुपये.
जर तुम्ही या योजनेत दोन लाख रुपये गुंतवले तर मुदतीवर तुम्हाला दोन लाख 29 हजार 776 रुपये मिळतील यामध्ये तुम्हाला 29 हजार 776 रुपये व्याजातून मिळतील. या योजनेत तुम्हाला निश्चित आणि सुरक्षित परताव मिळतो ज्यामुळे तुमचे बचत वाढवण्यास मदत होते. सध्याच्या अस्थिर आर्थिक परिस्थितीत पोस्ट ऑफिसची एफडी योजना एक चांगला परताव देणारा पर्याय ठरू शकतो.
1 thought on “पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 24 महिने 1 लाख रुपये गुंतवले तर किती नफा मिळेल?”