Air Force Requirement: भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर माहिती

Air Force Requirement: भारतीय हवाई दलामध्ये नोकरी करण्याचे सुवर्णसंधी इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी निर्माण झाली आहे. तुम्ही देखील भारतीय हवाई दलामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवायचे आहे त्यांच्यासाठी ही संधी चालून आली आहे. भारतीय हवाई दलाने एअरमन ग्रुप वर नॉन टेक्निकल मेडिकल असिस्टंट ट्रेड (एअरमन इनटेक 02/2026) पदाची घोषणा केली आहे.

भारतीय हवाई दलच्या या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हवाई दलाच्या अधिकृत वेबसाईटवर 11 जुलै 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अर्ज करू इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना indianairforce.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 11 जुलैपासून अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. या कालावधी दरम्यान इच्छुकांनी आपला अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 11 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2025

अर्ज करण्यासाठीची पात्रता

भारतीय वायुसेना वेदकीय सहाय्यक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी इयत्ता बारावी मध्ये किमान 50% गुणासह (mathematics, physics, and English) किंवा इंजीनियरिंग डिप्लोमा (mechanical / electrical / electronics / automobile / computer science / instrumentation technology / information technology) किंवा गैरव्यवसायिक विषयासह दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम. किंवा 50% गुणासह बारावी उत्तीर्ण + 50% पेक्षा जास्त इंग्रजी विषयात मार्क. याशिवाय राज्य फार्मसी कॉन्सिल किंवा प्रति फार्मसी कॉन्सिलकडे वेध नोंदणी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा काय आहे?

वैद्यकीय सहाय्यक पदासाठी उमेदवाराची जन्मतारीख 2 जुलै 2005 ते 2 जुलै 2009 दरम्यान असणे आवश्यक आहे. दोन्ही तारखा ग्राह्य धरल्या जातील. तसेच जर उमेदवाराची निवड प्रक्रिया पूर्ण झाली तर 12 वी उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 21 वर्षे असेल आणि डिप्लोमा बीएससी फार्मसी वाल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा 24 वर्षापर्यंत असेल.

उंची व छाती:

वैद्यकीय सहाय्यक आणि वैद्यकीय सहाय्यक फार्मासिस्ट पुरुष उमेदवारांची उंची 152.5 सेंटीमीटर असावी. तसेच पुरुष उमेदवारांच्या छातीचे माप 77 सेमी असावे. जे 5 सेमी पर्यंत फुगवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेमी असावी. याचबरोबर वजन हे उंचीला अनुरूप असणे गरजेचे आहे.

वेतन:

प्रशिक्षणा दरम्यान उमेदवारास दरमहा 14 हजार 600 रुपये वेतन मिळेल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना दरमहा 26 हजार 900 रुपये वेतन दिले जाईल. त्याचबरोबर इतर प्रकारचे भत्ते आणि सर्व सुविधा उमेदवारांना दिल्या जातील. Air Force Requirement

निवड प्रक्रिया कशी केली जाईल?

अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया सर्वप्रथम ऑनलाइन चाचणी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल, शारीरिक परीक्षेमध्ये 21 वर्षाच्या उमेदवारांना 7 मिनिटात 1.6 किलोमीटर धावावे लागणार आहे. तर 21 वर्षापेक्षा जास्त वयाच्या उमेदवारांना 7 मिनिटे 30 सेकंद दिले जातील. त्यानंतर वैद्यकीय चाचणी घेतली जाईल अशा प्रकारे 3 टप्प्यांमध्ये उमेदवाराची निवड केली जाईल.

अर्ज शुल्क:

ऑनलाइन नोंदणीसाठी उमेदवाराकडून 550 रुपये अर्ज शुल्क आकारला जाईल.

ऑनलाइन लेखी परीक्षा साठी वेळ 45 मिनिटं ठेवण्यात आला आहे. यामध्ये इंग्रजी, लॉजिकल रीझनिंग आणि सामान्य ज्ञान या विषयावर प्रश्न विचारले जातील. प्रत्येक योग्य उत्तरासाठी एक गुण मिळेल आणि चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.

या भरती संबंधित इतर माहितीसाठी इच्छुक उमेदवार भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!