Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 आर्थिक मदत दिली जाते. मागील वर्षी जुलै 2024 पासून या योजनेची सुरुवात झाली असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत 11 हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. या योजनेचा जून महिन्याचा हप्ता जून महिना संपला तरी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नाही. दरम्यान जून महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना कधी मिळेल? असा प्रश्न महिलांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तुमच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झाला का नाही? हे कसे तपासावे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक सवलंबी बनवणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेने आतापर्यंत एकूण 12 महिने पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले आहेत. लाडक्या बहिणी बारावी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने जून महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आता हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात कधी जमा होणार? याकडेच सर्व महिलांची लक्ष आहे. Majhi Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | ‘या’ लाडक्या बहिणींना 1500 रूपये मिळवणे बंद होणार? आदिती तटकरेंची मोठी माहिती..
जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार का?
मे महिन्याचा हप्ता जूनच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला होता. आणि जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात जमा होणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींना आता जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार का असा प्रश्न पडत आहे. किंवा जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यात तर मिळणार नाही ना? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. मात्र मीडिया रिपोर्ट नुसार जुलै महिन्याचा आता जुलै महिन्यामध्ये दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हा दावा खरा ठरला तर जुलै महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लाडक्या बहिणींना हा लाभ मिळू शकतो.
तुमच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचा हप्ता जमा झाला का नाही कसे तपासावे?
- यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये लॉग इन करून तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता. तिथे तुम्हाला योजनेच्या पैशाची हिस्ट्री दिसेल.
- फोन पे किंवा तत्सम UPI एप्लीकेशन वापरूनही तुम्ही तुमच्या खात्यात किती पैसे आहेत तपासू शकता.
- अनेक बँका मिस कॉल द्वारे शिल्लक रक्कम तपासण्याचे सुविधा देतात. तुमच्या बँकेने दिलेल्या नंबर वर मिस कॉल देऊन तुम्ही तुमचे बँक बॅलन्स तर बसू शकतात.
- जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तपासणे शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेतील शाखेत जाऊन पासबुक वर एन्ट्री करून लाडकी बहिणी योजनेचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का नाही हे तपासू शकता.
वरीलपैकी कोणत्याही एका सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नाही याची खात्री करून घेऊ शकता.
1 thought on “लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती…”