Post Office Scheme | जर तुम्ही देखील भविष्यासाठी गुंतवणूक करायचा विचार करत असाल तरी बातमी तुमच्यासाठीच आहे आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक माहिती घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये तुम्ही सहज पद्धतीने गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकणार आहात. गुंतवणूक करायचा म्हटलं की पहिला विचार येतो आपल्याला परतावा किती मिळेल नंतर विचार येतो आपले रक्कम गुंतवलेली सुरक्षित आहे का ह्या दोन्ही गोष्टी एकदा जुळल्या की मग आपलं भविष्य एकदम उज्वल होत राहतं.
कधी कधी संसाराचे बजेट बिघडतं…. महागाई वाढते, गरजा वाढतात… आणि अशावेळी जर घरात एखाद्या ठराविक उत्पन्नाचा स्त्रोत मिळत राहिला, तर आयुष्य किती सुपर होईल ना? अशीच एक हमखास योजना पोस्ट ऑफिस कडून सुरू करण्यात आली आहे, जी तुमच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा ₹9000 रुपये उत्पन्न देऊ शकते. हो भाऊ, आता तुमची घरची लक्ष्मी बनवणार आहे तुमचा आर्थिक कणा! Post Office Scheme
सध्या अनेक बँकेंनी FD चे व्याजदर कमी केले आहेत, पण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत अजूनही जबरदस्त व्याजदर मिळत आहेत. अशीच एक स्कीम आहे Monthly Income Scheme (MIS). या योजनेचा फायदा घेतला, तरी एकदाच गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा निश्चित रक्कम मिळणार आहे, ती पण थेट खात्यावर.
काय आहे योजना ?
ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिस ची मंथली इन्कम स्कीम. या तुम्ही एकदाच गुंतवणूक करता आणि त्यावर तुम्हाला दर महिन्याला फिक्स व्याज मिळते आणि हे व्याज तुमच्या खात्यावरती जमा होते. या योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे. आणि विशेष म्हणजे, ही स्कीम जॉईंट अकाउंट स्वरूपाची ओपन करता येते.
पत्नी सोबत गुंतवणूक करा आणि दरमहा मिळवा ₹9,000 रुपये
जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर जॉईन खाते उघडलं आणि त्यात एकूण 14.60 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला दरमहा 9,003 रुपये व्याज मिळेल. ही व्याजदर महा तुमच्या खात्यावरती जमा होईल – 5वर्ष सलग ही रक्कम मिळवण्यासाठी MIS वर 7.4% व्याजदर लागू होतो.
गुंतवणुकीचे उत्तम उदाहरण:
- गुंतवणूक : ₹14,60,000 (Joint account husband and wife)
- व्याजदर : 7.4% वार्षिक
- मासिक उत्पन्न : ₹9,003
- कालावधी : पाच वर्ष
- व्याजदर थेट बचत खात्यावरती जमा
योजनेचे फायदे
सरकारी हमे असलेली योजना गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे, तर दरमहा खात्रीशीर उत्पन्न मिळते, पत्नीसोबत नाव ठेवून भविष्यातील फिक्स इन्कम बनवता येते. निवृत्ती योजना, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घर खर्चासाठी उपयुक्त आहे.
अंतिम विचार….
भाऊ, आज महागाईच्या काळात जर तुम्ही आणि तुमची पत्नी मिळून एखादी श्वास्वत योजना निवडली, तर तो निर्णय पुढे जाऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी फायदेशीर ठरतो. फिक्स उत्पन्न, सुरक्षित गुंतवणूक आणि पती-पत्नीचा संयुक्त निर्णय हे त्रिसूत्रि तुमचा संसार आर्थिक दृष्ट्या बळकट करेलच. म्हणूनच, घरच्या लक्ष्मीला बरोबर घेऊन पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम मध्ये गुंतवणूक करा आणि दरमहा आरामात मिळवा ₹9,000 पेक्षा अधिक उत्पन्न !
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये मिळत आहे महिन्याला ₹3000 रुपये पण ते कसे पहा