School News : दहावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचं वळण, गावाकड असो किंवा शहरात इयत्ता दहावीची परीक्षा जवळ आली की सगळ्यांचे लक्ष एकच ठिकाणी लागतं आता पुढे काय होणार? आई वडील दिवस रात्र महिन्यात करतात, शिक्षक शिकवणी लावतात, आणि विद्यार्थी कसाबसा अभ्यास करतो. पण आता सगळ्यात एक मोठा बदल घडतोय. आणि तो असा की, CBSE बोर्ड निर्णय घेतला की दहावीची परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याला आता त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करायची थेट संधी मिळणार आहे. School News
यंदापासून म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून हा नवीन बदल लागू होणार आहे. 2026 साली होणारी दहावीची परीक्षा दोन टप्प्यात होईल पहिली फेब्रुवारी महिन्यात आणि दुसरी मे महिन्यामध्ये. पहिली परीक्षा अनिवार्य असेल, म्हणजे सगळ्यांनाच द्यावी लागेल. पण जर कोणाला वाटलं की मी जास्त गुण मिळू शकतो, तर त्याच्यासाठी दुसरा टप्प्यात पुन्हा परीक्षा द्यायची मोकळी संधी असेल. यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या कष्टाला दुसरी संधी मिळणार आहे.
शाळांमध्ये सुरसुर शिक्षक आणि पालक काय म्हणतात?
या निर्णयानंतर सर्वच पालकांना आणि शिक्षकांना सदैव प्रश्न पडलेला आहे शिक्षकांचे म्हणणं आहे की हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आहे. जे मुलं पहिल्या प्रयत्नात फार चांगलं करू शकत नाही, त्यांना दुसरी संधी मिळेल. दुसरीकडे पालक चिंता व्यक्त करताय मुलांवर दडपण वाढणार नाही ना? वर्षभर अभ्यास मग दोन वेळा परीक्षा यातून मुला थकून जाईल.
पण बोर्डाने ही काळजी घेतली आहे. बोर्डाच्या परीक्षेत ट्रक भारद्वाज संयम यांनी स्पष्ट केले आहे की, ही दुसरी परीक्षा पूर्णपणे पर्यायी आहे. म्हणजेच फेब्रुवारीत ज्या विद्यार्थ्यांना समाधानकारक गुण मिळाले, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही. पण जरा कमी मार्काने मागे राहिले, त्यांना गुण सुधारण्याची संधी मिळणार.
गावाकडे देखील हुशार विद्यार्थी असतात, पण कधी परिस्थितीमुळे तर कधी खर्ची जबाबदारीमुळे अभ्यास नीट करता येत नाही. दहावीचा निकाल खराब आला की बरेचदा त्यांना शिक्षणाची आवड वाटत नाही. अशावेळी दुसरी परीक्षा ही त्यांच्या आयुष्यातील संधी बनू शकते. फेब्रुवारी जर त्यांच्या अपेक्षित प्रमाणे यश मिळालं नाही तर ते मे महिन्यामध्ये पुन्हा पेपर देऊन चांगली संधी मिळू शकतात.
हा निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (NEP 2020) घेण्यात आलेला आहे. सर्कस उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना केवळ एक परीक्षेच्या यश अपयशावर अवलंबून ठेवता त्यांना सुधारण्याची संधी दिली जावी. त्यामुळे ही संकल्पना समोर आली आहे. भविष्यात महाराष्ट्र बोर्ड, ICSE तुम्हा इतर राज्य बोर्ड ही अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात या दिवसापासून होणार मुसळधार पाऊस…