Bank New Rules | सध्या पैसे म्हटलं की आपण बँकेमध्ये पैसे साठवायचा विचार करतो. सध्या बँकेचे नियम दिवसेंदिवस बदलत चाललेले आहे. त्यामुळे आपल्याला देखील याची माहिती असणे आवश्यक आहे. मित्रांनो प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या अपडेट नुसार, जर तुमचं खातं DBS बँकेत असेल तर ही बातमी अगदी कान देऊन ऐका. १ ऑगस्ट २५ पासून बँकेत नवा नियम लागू केलाय. आणि तो असा की, तुमच्या खात्यात किमान ₹10,000 रुपये शिल्लक राहिलाच पाहिजे. जर कमी रक्कम राहिली तर बँक तुम्हाला थेट पाचशे रुपये दंड आकारणार आहे.
म्हणजे अगदी साधं सांगायचं झालं, तर कुठलेही कारण असो, महिन्याअखेरीस तुमच सरासरी बॅलन्स जर दहा हजार रुपयांच्या खाली गेलं.. तर बँक काही विचारणार नाही थेट तुमचं खाते डेबिट करेल. Bank New Rules
हे पण वाचा | 1 मे पासून हे पाच नवीन नियम होणार लागू, सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार परिणाम
DBS बँकेचे नवीन काय नियम सांगतो?
एक ऑगस्ट 2025 पासून नियम लागू होणार आहे खात्यामध्ये मासिक सरासरी दहा हजार रुपये रक्कम शिल्लक ठेवावे लागणार आहे शिल्लक नसेल तर पाचशे रुपये किंवा 6% दंड आकारण्यात येणार आहे हे नियम DBS च्या सर्व सेव्हिंग खात्यांना लागू.
आणखी एक मोठा बदल
जर तुम्ही वारंवार एटीएम मधून पैसे काढत असाल, तो ही गोष्ट लक्षात ठेवा एक मे पासून एटीएम व्यवहारांवर नवीन नियम लागू झालेला आहे. फ्री व्यवहारांची मर्यादा उलनली की प्रत्येक व्यवहाराला 23 रुपये शुल्क लागणार आरबीआय ने याला मान्यता दिली बँकेने ग्राहकाला मेल पाठवून ही माहिती दिली.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)