Gharkul beneficiary list : जर तुम्ही देखील घरकुल योजनेचा अर्ज केला आहे आणि तुमचे नाव मंजूर झाले आहे की नाही हे कसे चेक करायचे तरी बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही तुमचे नाव यादीमध्ये चेक करू शकता याची माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तुमचे नाव चेक करण्यास मदत होणार आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Gharkul beneficiary list
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी सरकारने पंतप्रधान आवास (PMAY-G) नावाची योजना सुरू केली या योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी नागरिकांना अनुदान दिले जात आहे. ही मदत गरीब कुटुंबातील घटकांसाठी एक मोठी मदत असल्याचा म्हटले जात आहे यामुळे लाखो कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झालेले आहे. मागील काही वर्षापासून ही योजना यशस्वीरीत्या राबवली जात असून यामुळे शेतकरी शेतमजूर आणि अल्प उत्पन्न घटकातील कुटुंबांना या योजनेमधून थेट घर बांधण्याची एक मोठी संधी मिळत आहे.
अनेक ग्रामीण भागातील नागरिकांनी त्यांना माहीतच नाही की योजना काय आहे या योजनेत आपण लाभार्थी आहोत की नाही. त्यासाठी सरकारने ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी यादी तपासणीची सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे तुम्ही तुमचे नाव एकदम सोप्या पद्धतीने चेक करू शकणार आहात.
नाव कसे तपासाल?
सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा संगणकावरती कोणत्याही ब्राउझर मध्ये खाली दिलेली एक लिंक उघडायचे आहे. https://pmayg.nic.in त्यानंतर होम पर्यावर Awaassoft या पर्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तिथे Social Audit Report हा पर्याय निवडा. त्यानंतर तिथे तुम्हाला Beneficiary details verification हा पर्याय दिसंत्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन MIS रिपोर्ट विंडो उघडेल.
यामध्ये तुम्हाला खालील दिलेली माहिती भरावी लागेल जशी की, तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, आणि गावाचे नाव.
योजनेचे वर्ष (उदा. 2023- 24), योजना प्रकार – PMAY -G नंतर दिलेला CAPTCHA CODE भरून SUBMIT किंवा GET REPORT वर क्लिक करा. तुमच्या गावातील सर्व लाभार्थी यादी स्क्रीनवर दिसेल. यामध्ये तुमचं नाव, घर मंजुरी क्रमांक, सध्याची बांधकाम स्थिती या माहितीचा समावेश असेल.
स्वतःचं घर असणे हे प्रत्येक नागरिकांचा स्वप्न आहे. ग्रामीण भागात अर्जेंट कुटुंबा आहेत त्यांना घर बांधणे शक्य नाही आणि ते झोपड्यांमध्ये राहत आहेत अशा वेळेस त्यांना घरकुल योजनेतून केंद्र सरकारने राज्य सरकार या ग्रामपंचायत यांचं सोमान्वय साधून तीन टप्प्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाते. तसेच हे अनुदान टप्प्याटप्प्याने दिले जात पहिल्या टप्प्यात जमीन घर मंजुरी दुसरा टप्प्यात बांधकाम सुरू असताना आणि तिसऱ्या टप्प्यात घर पूर्ण झाल्यावर ती अंतिम रक्कम दिली जाते.
हे पण वाचा | Pm Kisan Yojana 20 व्यां हप्त्याची लाभार्थी यादी! शेतकऱ्यांनो, लाभार्थी यादीमध्ये नाव पहा