Baba Vanga Prediction | स्मार्टफोन… नावातच स्मार्टपणा, पण वापर चुकीचा झाला तर तो ठरतोय थेट ‘हेल्थच्या’ वाटेचा शत्रू. आणि याच स्मार्टफोनविषयी बर्याच वर्षांपूर्वीच जगप्रसिद्ध अंध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांनी धोक्याचा इशारा दिला होता. त्या इशाऱ्याचा अचूक परिणाम आज आपण आपल्या आजूबाजूला पाहतोय नात्यात दुरावा, मनःस्वास्थ्य बिघडलेलं आणि शरीरावर मोबाईलच्या अतिवापराचे गंभीर परिणाम दिसतायत. Baba Vanga Prediction
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बाबा वेंगाचं भविष्यदर्शन खरं ठरतंय?
बाबा वेंगाच्या भाकितानुसार, एक काळ असा येईल की एका छोट्याशा उपकरणामुळे माणूस स्वतःच्याच आयुष्याचा गुलाम बनेल. आज पाहिलं तर प्रत्येकाच्या खिशात असलेला स्मार्टफोन हा त्याचं ठोस उदाहरण आहे. खाणं, झोपणं, उठणं, चक्कर मारणं प्रत्येक गोष्टीत स्मार्टफोनचा इतका शिरकाव झालाय की त्याशिवाय काही सुचतच नाही.
बालकांपासून वृद्धांपर्यंत सगळे फसले स्क्रीनच्या जाळ्यात
नुकत्याच एका अहवालानुसार, देशातील २४% मुलं झोपण्याआधी मोबाईलवर असतात. यामुळे त्यांच्या मेंदूवर, मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतोय. मैदानं, खेळ, पुस्तकं, मित्रमंडळी हे सगळं मागे पडलंय. त्यांचं आयुष्य स्क्रीनपुरतंच सीमित झालंय.
सतत सोशल मीडियावर राहून व्यसनासारखी लक्षणं
ही लक्षणं केवळ एखाद्या विशिष्ट वयोगटात नाहीत, तर अगदी सर्व वयोगटांमध्ये दिसून येतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही बिघडतंय. बाबा वेंगाचं ते भाकित की “एक यंत्र माणसाला जखडून टाकेल”, ते आज 100% सत्य होताना दिसतंय.
हे पण वाचा | 2025 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचा धोका? बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमुळे जगभर खळबळ
नातेसंबंध तुटण्यामागेही स्मार्टफोन?
सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसल्याने कुटुंबातील संवादच कमी झाला आहे. घरातच अबोला वाढतोय. प्रेम, संवाद, स्नेह या भावना मोबाईलच्या नोटिफिकेशन्समध्ये गडप होत आहेत. एकत्र राहणारी माणसं मनाने मात्र दूरदूर जात आहेत.
मोबाईलच्या अतिवापरामुळे माणूस नुसताच आळशी नाही, तर मानसिकदृष्ट्याही थकलेला वाटतोय. बाबा वेंगाच्या इशाऱ्याने हे आधीच सूचित केलं होतं की माणूस भविष्यात एका यंत्राचा गुलाम बनेल. आणि आज ती वेळ प्रत्यक्षात आली आहे.
(डिस्क्लेमर : अशा बातम्यांना महाराष्ट्र बातमी team दुजोरा देत नाही व याबाबत आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे संबंधित बातमीची सखोल चौकशी करा)
1 thought on “Baba Vanga Prediction : बाबा वेंगाचा धोक्याचा इशारा! ‘खिशातली ही वस्तू’च ठरतेय आजाराचं मूळ कारण, नातेसंबंधही ढासळत आहेत”