Weekly horoscope | जून महिना शेवटाकडे झुकतोय आणि त्याचसोबत नव्या घडामोडी, नव्या आशा आणि काही ताणतणाव घेऊन आलेला हा आठवडा काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी संघर्षमय ठरू शकतो. नोकरी, व्यवसाय, प्रेम, आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर या आठवड्याचे ग्रहयोग कसा परिणाम करतील, हे जाणून घेणं महत्त्वाचं. चला मग जाणून घेऊया या आठवड्यात कोणा राशीला दिलासा मिळणार आणि कोणासाठी टेन्शन वाढणार आहे…
मेष राशी (Aries)
या आठवड्यात तुमच्यासमोर करिअरमध्ये काही मोठी आव्हानं येणार आहेत. वरिष्ठांकडून अपेक्षित पाठिंबा मिळणार नाही, सहकारी तुम्हाला समजून न घेण्याची शक्यता आहे. पण तुमचा आत्मविश्वास आणि चिकाटीचं बळ यामुळे तुम्ही परिस्थितीवर मात करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवड्याच्या शेवटास चांगला सौदा हातात येण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात जुने प्रश्न उफाळून येऊ शकतात, त्यामुळे बोलताना संयम राखा. ‘राग’ तुमचा शत्रू ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने सुरुवातीचे 3 दिवस थोडे थकवणारे असतील, पण नंतर स्फूर्ती परत येईल. योग, ध्यान यांचा सराव फायदेशीर ठरेल. Weekly horoscope
हे पण | राशिभविष्य: आज या राशीसाठी शुभ संकेत; होणार आर्थिक फायदा! जाणून घ्या सविस्तर माहिती
वृषभ राशी (Taurus)
जुन्या आर्थिक तणावांनी पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात, त्यामुळे कुठल्याही निर्णयापूर्वी विचार करणं गरजेचं आहे. नोकरीत तात्पुरता दबाव असेल पण संयम राखाल तर गोष्टी तुमच्या बाजूने वळू शकतात. व्यवसायिकांनी कोणताही नवा प्रकल्प सुरू करण्याआधी जोखमींचा अंदाज घ्यावा. वैयक्तिक नात्यांमध्ये ‘शंका’ किंवा गैरसमज तयार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवादात पारदर्शकता ठेवा. आरोग्य ठीक राहील, पण थकवा जाणवेल. भरपूर पाणी प्या आणि झोपेची कमतरता टाळा.
मिथुन राशी (Gemini)
हा आठवडा तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन येतोय. नोकरीत पदोन्नतीचं योग आहे, विशेषतः जे नव्या जबाबदाऱ्यांची वाट पाहत होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी मिळू शकते. जे करिअर बदलण्याच्या विचारात आहेत, त्यांना योग्य संधी मिळेल. व्यवसायात जुने अडथळे दूर होऊन नवी वाट मोकळी होईल. प्रवासाचे योग निर्माण होतात, आणि त्यातून काही महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित होईल. प्रेमसंबंधात चैतन्य येईल. मात्र आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहा पचनसंस्था बिघडण्याची शक्यता आहे, आणि झोपेच्या वेळेची वाट लागल्यास चिडचिड वाढू शकते. घरच्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्या
(Disclaimer : वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यम व माहिती स्त्रोतांच्या आधारे आहे, याबाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही)