पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या तारखेला खात्यात जमा होणार; तुमच्या खात्यात कधी जमा होणार ₹2,000?

Beneficiary status: देशातील करोडो शेतकरी जे पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही देखील या योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्याहाला देखील या योजनेचे दोन हजार रुपये कधी जमा होणार असा प्रश्न निर्माण झाला असेल. तर याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक पाठबळीसाठी एक महत्त्वकांशी पाऊल उचलले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे त्यांच्या आर्थिक गरजा भागवणे आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा करण्यात आले आहेत. आणि आता सर्वांना 20व्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत. Beneficiary status

हे पण वाचा| शेतकऱ्यांना सौर फवारणी पंपावर किती टक्के अनुदान मिळते? जाणून घ्या खरी माहिती इथे…

20वा हप्ता कधी मिळणार?

तुम्ही देखील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची लाभार्थी असाल तर तुम्हाला देखील 20वा हप्ता कधी मिळेल याची उत्सुकता लागली असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या बिहार दौऱ्यात या योजनेचा 19 वा हप्ता जारी केला होता. 19 वा हप्ता वितरित झालेला चार महिन्याहून अधिक काळ उलटून गेला आहे. त्यामुळे देशभरातील लाखो शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामासाठी बियाणे खरेदीसाठी आणि इतर शेतीच्या आवश्यक गरजा भागवण्यासाठी या योजनेचा निधी महत्त्वाचा ठरत आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता शुक्रवारी 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ही तारीख जरी अधिकृतपणे जाहीर झालेली नसली तरी विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तारखेला या योजनेचा निधी वितरित केला जाण्याची शक्यता आहे. सरकारने या आधी देखील महिन्याच्या 20 ते 30 तारखेच्या दरम्यान अनेक योजनेचे हप्ते जारी केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी 20 जून नंतर आपल्या बँक खात्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. 20वा हप्ता जारी करण्यापूर्वी सरकारकडून या हप्त्याची अधिकृत तारीख निश्चितपणे जाहीर केली जाईल आणि त्यानंतर लगेच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या अधिकृत घोषणाची वाट पहावी.

हे पण वाचा| जून महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार, कोणाला नाही? जाणून घ्या सविस्तर..

ई केवायसी झाली का?

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे जर तुमची केवायसी पूर्ण झालेले नसेल तर तुम्हाला 20वा हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. केंद्र सरकारने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट लाभार्थ्यांना वगळण्सायाठी ई केवायसी पद्धत अनिवार्य केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ते तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा या योजनेचा हप्ता जारी झाल्यावरही तुम्हाला तुमच्या हक्काचे दोन हजार रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळील सीएससी केंद्रात भेट देऊन किंवा पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

हे पण वाचा| 93 वर्षांचं खरं प्रेम! एका सोन्याच्या दुकानातील हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल…

तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का?

तुमचे नाव पी एम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत आहे का नाही किंवा तुमचे नाव या यादीतून वगळले तर नाही ना ते तपासण्यासाठी अगदी सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर होम पेजवर तुम्हाला लाभार्थी यादी (beneficiary list) हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडण्यास सांगितले जाईल हे सर्व माहिती अचूक भरा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्ट (gate report) या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या स्क्रीनवर तुमच्या गावातील सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी दिसेल. या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव आहे का नाही तपासून शकतात.

जर तुम्ही अजून ई केवायसी केली नसेल तर त्वरित पूर्ण करून घ्या. तसेच पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर वेळोवेळी भेट देऊन किंवा विश्वासनीय बातम्याच्या माध्यमातून 20व्या हप्त्याच्या अधिकृत घोषणेची माहिती घेत रहा. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणत आहे त्यामुळे या योजनेचा लाभ चुकवू नका. Beneficiary status

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या तारखेला खात्यात जमा होणार; तुमच्या खात्यात कधी जमा होणार ₹2,000?”

Leave a Comment

error: Content is protected !!