शेतकऱ्यांना सौर फवारणी पंपावर किती टक्के अनुदान मिळते? जाणून घ्या खरी माहिती इथे…

Solar favarni Pump Yojana: आज-काल धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेती करणे हे दिवसेंदिवस अवघड होत चालला आहे. वाढत्या खर्चामुळे आणि हवामानात होणाऱ्या बदलामुळे शेतीत नफा मिळवणे हे मोठे काम झाला आहे. अशा वेळेस आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरून कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारची शेती पिकवणे हे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. आपल्या शेत पिकाची निगा राखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी अशाच अनेक योजना आणल्या आहेत ज्या महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या योजनेपैकी एक अतिशय महत्त्वाचे आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकणारी योजना म्हणजे सौर ऊर्जावर चालणारा फवारणी पंप योजना. ही योजना केवळ शेतकऱ्यांचा खर्च वाचवत नाही तर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मदत करत आहे. तुम्ही विचार करत असताल की हा पंप नेमका काय आहे याचे फायदे काय आहेत? तर शेतकरी मित्रांनो हा आधुनिक पंप आहे जो सूर्यप्रकाशाच्या मदतीने चालवला जातो. या पंपाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या शेतीतील किती नाशके बुरशीनाशके किंवा इतर औषधी सहजपणे फवारू शकतात.

या योजनेसाठी किती अनुदान मिळते?

सध्या सोशल मीडियावर एक चर्चा खूप रंगली आहे, या योजनेअंतर्गत स्वर फवारणी पंपावर 100% अनुदान मिळत आहे. ही बातमी वाचून अनेक शेतकऱ्यांना मोठा आनंद झाला आहे. पण यात पूर्ण सत्य काय आहे हे आपण जाणून घेऊया. खरंतर या योजनेमध्ये काही विशिष्ट लाभार्थ्यांना विशेषता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना संपूर्ण शंभर टक्के अनुदान मिळण्याची तरतूद आहे. म्हणजेच अशा शेतकऱ्यांना हा स्वर फवारणी पंप पूर्णपणे मोफत मिळणार आहे. अशा लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.

हे पण वाचा| जून महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार, कोणाला नाही? जाणून घ्या सविस्तर..

मात्र त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी सवलत दिली आहे. या योजनेअंतर्गत इतर शेतकऱ्यांना 70% ते 80% पर्यंत अनुदान मिळू शकते. याचा अर्थ असा की जर तुम्हाला पूर्ण पंप मोफत मिळाला नाही तर तुम्ही ठराविक टक्के रक्कम भरून हा आधुनिक पंप मिळवू शकतात. अनुदानाची रक्कम प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि तुमच्या अर्जाच्या क्रमांकानुसार निश्चित केली जात आहे. त्यामुळे तुम्हाला किती अनुदान मिळाले हे तुमच्या परिस्थितीवर आणि अर्जावर अवलंबून आहे. फक्त गोरगरीब शेतकऱ्यांनाच या योजनेचा मोफत लाभ मिळणार आहे.

सरकारच्या नवीन निर्णयानुसार महाडीबीटी पोर्टलवर कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आता शेतकरी आयडी तयार करावी लागणार आहे. एकदा ही आयडी मिळाल्यानंतरच तुम्ही विविध योजनेसाठी अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांना डिजिटल पार्श्वभूमीवर आणण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. यामुळे सर्व प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक होत आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी सहजपणे अर्ज करू शकतो.

हे पण वाचा| 93 वर्षांचं खरं प्रेम! एका सोन्याच्या दुकानातील हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल…

अर्ज कसा करावा?

चोर फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपे आहे त्यासाठी तुम्हाला आम्ही खाली दिलेल्या सर्व स्टेप फॉलो कराव्या लागतील.

  • सर्वप्रथम अधिकृत महाडीबीटीच्या पोर्टल वर जावे लागेल. याची लिंक आम्ही वर दिली आहे.
  • तुमचा शेतकरी आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सोर फवारणी पंप योजनेची निवड करावी लागेल.
  • आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेल्या सर्व बाबी अचूक भरायचे आहेत. आणि तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.

या योजनेसाठी प्रथम येणाऱ्या अर्जांना प्राधान्य हे तत्व लागू आहे. याचा अर्थ जो शेतकरी लवकरात अर्ज करेल त्याला लॉटरीमध्ये हा पंप मिळण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर तुमच्या त्याने अर्ज करता येईल तेवढ्या लवकर जवळील सीएससी केंद्रामध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या योजनेला अर्ज करून घ्या. Solar favarni Pump Yojana

हे पण वाचा| खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी..

आवश्यक कागदपत्रे कोणती?

अर्ज करताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे देणे आवश्यक असतील. ही कागदपत्रे आधीच तयार ठेवल्यावर तुमचा वेळ वाचेल आणि अर्ज प्रक्रिया लवकर पूर्ण होईल.

  • आधार कार्ड
  • फार्मर आयडी
  • सातबारा उतारा किंवा जमीनधारक प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर

हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! या दिवशी खात्यामध्ये जमा होणार पीएम किसानचे ₹2000 रुपये

इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्राथमिक क्षणांनी केली जाते. त्यानंतर पात्र अर्जाची संगणक पद्धतीने तपासणी केली जाते आणि त्यातून एक लॉटरी निवडली जाते. ज्या अर्जाची निवड होते त्यांना सरकारच्या कृषी विभागाकडून अधिकृत एस एम एस द्वारा माहिती दिली जाते. निवड झाल्यानंतर संबंधित कृषी अधिकारी आणि विक्रेतेच्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला स्वर फवारणी पंप वितरित केला जातो.

ही योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी एक मोलाची भूमिका बजावत आहे. यामुळे त्यांच्या फवारणीचा खर्च कमी होईल डिझेल आणि विजेवरील फवारणी पंपासारखे या पंपाला कोणत्याही इंधनाची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर अजिबात वेळ वाया न घालवता आजच मराठी बीटी पोर्टल वर जाऊन अर्ज करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या. आपल्या शेतीला आधुनिक बनवण्यासाठी आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी सौर फवारणी पंप वापरणे महत्त्वाचे आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “शेतकऱ्यांना सौर फवारणी पंपावर किती टक्के अनुदान मिळते? जाणून घ्या खरी माहिती इथे…”

Leave a Comment

error: Content is protected !!