SBI च्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी!

SBI Bank News : देशातील सर्व सामान्य गुंतवणूकदार आणि विशेषता निवृत्त जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या लोकप्रिय Amrit वृत्ती FD योजनेवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून, हा नवा दर 15 जून 2025 पासून लागू करण्यात आलेला आहे. बँकांकडून एफडी वरील दर कमी होण्याची ही मालिका सुरूच असून, गेल्या आठवड्यामध्ये ICICI, HDFC आणि कॅनरा बँकांनीही आपल्या FD व्याजदरात मोठी घट केली आहे. SBI Bank News

रेपो दर कपात आणि त्याचे परिणाम

भारतीय रिझर्व बँकेने सलग तिसऱ्यांदा रिपो दरामध्ये 50 बेसिस पॉईंटची कपात केली असून, त्याचा थेट परिणाम बँकांच्या एफडी योजनेवरती झाला आहे. जरी कर्ज घेणाऱ्यांसाठी ही कपात सुखद असली तरी, FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी विशेषता ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक आर्थिक चिंता ठरणारी बाब आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आता अमृत वृत्ती योजनेवर किती व्याज मिळेल?

यूएसबीआयच्या सुधारित दरानुसार, 444 दिवसांच्या अमृत वृत्ती एफडी योजनेवर आता फक्त 6.6% व्याजदर मिळणार आहे, जो यापूर्वी 6.85% होता. यामध्ये जेष्ठ नागरिकांना 7.10% वार्षिक व्याज मिळणार असून, 80 वर्ष व त्याहून अधिक वय असलेल्या अति जेष्ठ नागरिकांना 7.20% व्याजदर देण्यात येईल. पूर्वीच्या तुलनेत ही एक लक्षात येण्याजोगी कपात आहे.

जर कोणी गुंतूनुकदार Fd पूर्ण मुदतीपूर्वी रद्द करण्यात आ निर्णय घेत असेल, तर पाच लाख रुपयांपर्यंत fd वरती 0.50% दंड आकारण्यात येणार आहे. तर पाच लाखांपेक्षा जास्त व तीन कोटीपर्यंतच्या एफडीवर 1% उदंड आकारण्यात येणार आहे. यामुळे अल्पमुदतीत पैसे काढण्याचा निर्णय महागात पडू शकतो.

पोस्ट ऑफिस योजना ठरू शकतात पर्याय

बँकेच्या घटत्या व्याजदरांच्या पार्श्वभूमी वरती अनेक गुंतवणूकदाराचा थेट पोस्ट ऑफिस बचत योजनेकडे वळत आहेत. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये अजूनही बँकांपेक्षा अधिक रिटर्न मिळतो, त्यामुळे ज्यांना स्थिर आणि खात्रीशीर उत्पन्नाची गरज आहे, त्यांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!