पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना! फक्त 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार 2.24 लाखांचा फायदा..

Post Office Scheme: आपल्या कष्टाचे पैसे आपल्या भविष्यासाठी सुरक्षित राहावेत आणि त्यावर चांगला परतावा मिळावा यासाठी प्रत्येक जण चांगल्या गुंतवणुकीच्या शोधात असतो. आज-काल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यातून योग्य पर्याय निवडून चांगला परतावा आणि सुरक्षित गुंतवणुकीचा विचार केल्यानंतर आपल्यासमोर सर्वात आधी बँकेच्या एफडी योजनेचा पर्याय उभा राहतो. बँकेमध्ये एफडी ची गुंतवणूक करणे सुरक्षित असते आणि त्यावर चांगला परतावा देखील मिळतो. मात्र जर तुम्हाला बँकेच्या एफडी योजनेमध्ये गुंतवणूक करायचे नसेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी आणखीन सुरक्षित आणि जास्त परता देणाऱ्या पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात.

पोस्ट ऑफिस अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक बचत योजना चालवते. आणि त्यातीलच एक अतिशय लोकप्रिय आणि फायदेशीर योजना म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC). आज आपण या लेखामध्ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक पाया तयार करून देऊ शकते. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या भविष्यातील अनेक कामांना वेग येऊ शकतो. या योजनेत गुंतवणूक करून कशा पद्धतीने तुम्ही लखपती होऊ शकता याबद्दल आपण जाणून घेऊया.

आधार कार्ड चे फायदे काय आहेत? आधार कार्ड मुळे कोणत्या योजनेचा तुम्हाला फायदा मिळेल; पहा सविस्तर..

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना म्हणजे काय?

पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना ही एक भारत सरकारच्या हमीवर चालवते. याचा अर्थ असा होतो की तुमची या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. यामध्ये तुमच्या गुंतवणुकीला कुठलाही धक्का लागणार नाही. तुमच्या पैशाला कोणताही धोका नाही कारण या योजनेला सरकारची पूर्ण हमी मिळते. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे या योजनेत गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतात.

सध्याच्या घडीला या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.7% वार्षिक व्याजदर दिला जातो. हा व्याजदर अनेक बँकांच्या एफडी दरापेक्षा जास्त आहे. ज्यामुळे NSC योजना अधिक आकर्षक आणि महत्त्वाची ठरते. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये अगदी कमी रकमेपासून गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही किमान 1000 रुपयापासून खाते उघडू शकतात. यामुळे सर्वसामान्य माणसालाही या योजनेत गुंतवणूक करणे सहज शक्य आहे.

हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कधी पडणार पाऊस? जाणून घ्या तारीख सोबत यादी…

या योजनेचा लॉक इन कालावधी पाच वर्षाचा आहे. याचा अर्थ असा की तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला किमान पाच वर्षासाठी ते पैसे काढावे लागणार नाहीत. ही अट काही जणांना बंधनकारक वाटू शकते पण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा कालावधी अधिक फायदेशीर ठरतो. पाच वर्षानंतर तुम्हाला एक मोठा फंड मिळतो जो तुमच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी खूप उपयोगी ठरू शकतो. Post Office Scheme

यामध्ये सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या योजनेत कंपाऊंडिंग व्याजाचा लाभ मिळतो. कंपाऊंडिंग व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज या योजनेतून तुम्हाला मिळेल. यामध्ये तुमच्या मूळ रकमेवर मिळणारे व्याज पुन्हा मूळ रकमेत जमा केले जाते आणि त्यावरही व्याज मिळते. यामुळे कालांतराने तुमच्या गुंतवणुकीची रक्कम वेगाने वाढते आणि पाच वर्षानंतर तुम्हाला एक मोठा निधी मिळतो. Post Office Scheme

हे पण वाचा| लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर..

पाच लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर किती फायदा मिळेल?

आता आपण या योजनेमध्ये एक ठराविक रक्कम गुंतवल्यानंतर त्यावर किती रक्कम नफा मिळेल व एकूण रक्कम तुम्हाला किती मिळेल हे सर्व गणित जाणून घेऊया. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला किती परतावा मिळतो पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेत जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना पाच वर्षानंतर एकूण किती रक्कम मिळेल हे जाणून घेऊया.

सध्याच्या 7.7% वार्षिक व्याजदराने, पाच वर्षाच्या मुदतीनंतर तुमच्या पाच लाख रुपयाचे रूपांतर सात लाख 24 हजार 513 रुपयांमध्ये होईल. याचा अर्थ असा की तुमच्या मूळ पाच लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला तब्बल 2 लाख 24 हजार 513 रुपये निवड नफा म्हणून मिळाला आहे. या योजनेतील हा परतावा खरोखर प्रभावी आहे आणि तुमच्या कष्टांच्या पैशाला अनेक पटीने वाढवतो अशा प्रकारचा सुरक्षित आणि निश्चित परताव देणारी योजना शोधणे कठीण आहे. त्यामुळे ही योजना तुमच्या भविष्यासाठी खूप मोठी फायद्याची ठरू शकते.

हे पण वाचा| शेतकऱ्यांना पिक विम्याचा शेवटचा हप्ता कधी मिळणार? आली महत्त्वाची अपडेट समोर..

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेची आणखी एक खासियत म्हणजे, तुम्ही केवळ स्वतःसाठीच नाहीतर दहा वर्षाखालील मुलांच्या नावावरही या योजनेत खाते उघडू शकतात. अशा खात्यांचे संचालन त्यांच्या पालक करतात. त्यामुळे मुलांच्या भविष्यासाठी लहानपणापासूनच बचत सुरू करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यातून मिळणारा निश्चित परतावा. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे आयकर फायद्याच्या कलम 80C अंतर्गत मिळणारी कर सवलत देखील या योजनेतून मिळते.

या कलमांतर्गत तुम्ही दरवर्षी एक पॉईंट पाच लाख रुपये पर्यंत ची गुंतवणूक करून आयकर सवलत मिळू शकतात. यामुळे एनसीसी योजना केवळ गुंतवणुकीसाठीच नाही तर कर वाचवण्यासाठी देखील एक उत्कृष्ट पर्याय आहे. फिक्स परतावं आणि कर सवलतीच्या दुहेरी लाभ घेण्यासाठी NSC योजना सर्वसामान्य गुंतवणूकदारासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. जर तुम्ही अशा गुंतवणूक पर्यायाच्या शोधात असाल जिथे तुमचा पैसा सुरक्षित राहील त्याचबरोबर उत्तम आणि चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला कर सवलत देखील मिळेल तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट NSC योजना तुमच्यासाठी अत्यंत योग्य पर्याय आहे.

NSC योजना केवळ आर्थिक सुरक्षिता देत नाही तर तुमच्या बचतीला चक्रवाढ व्याजाने वाढवून तुमच्या आर्थिक उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्यास मदत करते. तुम्ही देखील तुमच्या कष्टाचे पैसे सुरक्षित आणि फायदेशीर ठिकाणी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजच जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. आणि गुंतवणुकीचा हा सुवर्ण पर्याय हातातून जाऊ देऊ नका.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना! फक्त 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार 2.24 लाखांचा फायदा..”

Leave a Comment

error: Content is protected !!