High alert Kolhapur : राज्यामध्ये सध्या पावसाची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे हे चित्र आता अति गंभीर वळण घेऊ लागलेला आहे. अशातच हवामान खात्याने एक मोठा इशारा वर्तवल्याने सर्वांचीच चिंता ता वाढली आहे. हवामान खात्याने राज्यात पुढील 24 तासासाठी सावध राहणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे आणि ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. यामध्ये हलका पाऊस नाहीतर वाऱ्यांचं जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे. High alert Kolhapur
पण खात्याने यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सावध राहण्याचा म्हटले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
कोल्हापुरात ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यांच थैमान
गेल्या काही तासांपासून कोल्हापुरात आकाश काळसर ढगांनी गडत झाला आहे. बाजारात काही दुकान बंद होऊन लागली आहेत. शेतकऱ्यांनी आपली मशागत थांबवून गोट्याजवळ छप्पर लावायला सुरुवात केलेली आहे. हवामान विभागाने सांगितले की येत्या काही तास महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे शेतकऱ्याने सतर्क रहावे या भागात वाऱ्यांचा वेग 50 किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस असलं तरी अंगावर जाणाऱ्या वाऱ्यांचा जोत प्रचंड आहे.
सांगली जिल्ह्यात काळजी घ्या, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा
यंदा सांगलीत पहिल्याच मोठ्या पावसाने मोठा झटका बसणार असल्याचे चित्र निर्माण झालेला आहे. जुना सांगलीत नदीकाठच्या भागात चिंतेचा वातावरण आहे. पाण्याच्या पातळी थोडी वाढ झाली तर मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आलेला आहे त्या मुळे शेतकरी बांधवांनी आणि नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क करावे असे म्हटले जात आहे.
साताऱ्यात संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता
सांगली कोल्हापूर नंतर साताऱ्यात देखील आज सकाळपासून वातावरणात बदल झालेला आहे. आकाश काळसर झाला असून अधून मधून विजेचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने या भागातील येलो अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे त्या काही तासात जोरदार पाऊस ची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
हे पण वाचा | पुढील 48 तासांमध्ये या जिल्ह्यात होणार गारपीट आणि मुसळधार पाऊस वाचा सविस्तर माहिती