सोन्याच्या भावात झाली आता मोठी वाढ! आता तुम्हाला एक तोळा सोन खरेदी करण्यासाठी मोजावे लागणारे इतके रुपये

Gold Price Today | घरात काही कार्यक्रम आहे? आणि तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर ही तुमची नक्कीच टेन्शन वाढवणार आहे, कारण आज आपल्याला एक मोठी अपडेट मिळाली आहे यामध्ये सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आपण नेहमी काही कार्यक्रमानिमित्त सोने खरेदी करायचा विचार करतो. कधी लग्नसराई, गुंतवणूक, जसे की एखादं घरातली मोठा कार्यक्रम साठी सोनं घ्यायचं ठरवतो. परंतु आता ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या दराने मोठी उडी घेतली आहे. आणि आज १२ जून 2025 रोजी तब्बल 99 हजारांच्या आसपास सोन विकला जात आहे. Gold Price Today

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव सतत घसरत होते. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत होता. अजूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे सहा ते 10 जून दरम्यान सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. पण 11 जूनला अचानक सोन्याच्या दारात मोठी उसळी झाली आणि त्याच वेळी सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. काल 24 कॅरेट सोन 820 रुपयांनी वाढलं, तर आज म्हणजे 12 जून रोजी ते 880 रुपयांनी महाग झाले. म्हणजे दोनच दिवसात सोन्याच्या दारात तब्बल 1700 रुपयांची मोठी वाढ झालेली आहे यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

मागच्या काही दिवसांपूर्वीचा विचार केला तर, 22 एप्रिल रोजी सोन्याच्या किमती मोठी वाढ झाली होती सोन्याचा दर जवळपास एक लाख रुपयांच्या वर गेला होता. त्यानंतर मे महिन्यात मात्र भाव ९३ हजार रुपये पर्यंत खाली आले. पण आता पुन्हा एकदम सोन लाखांच्या दिशेने धावतोय असं आपल्याला पाहायला मिळते. यामुळे सर्वसामान्य आणि जे लोक कार्यक्रमानिमित्त सोने खरेदी करू इच्छित होते त्यांना नक्कीच मोठा फटका आणि झळ लागणार आहे. चला तर मग पाहूया आजचे सोन्याचे दर.

हे पण वाचा | सोने खरेदी करण्याचा विचार करताय? लगेच जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर

महाराष्ट्रातील शहरानुसार सोन्याचे दर (Gold rates by city in Maharashtra)

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव

  • 18 कॅरेट – ₹74,460 प्रति दहा ग्रॅम
  • 22 कॅरेट – ₹91,000 प्रति दहा ग्रॅम
  • 24 कॅरेट – 99,280 प्रति दहा ग्रॅम

नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी

  • 18 कॅरेट – ₹74,460 प्रति दहा ग्रॅम
  • 22 कॅरेट – ₹91,000 प्रति दहा ग्रॅम
  • 24 कॅरेट – 99,280 प्रति दहा ग्रॅम

जर तुम्ही देखील सोने खरेदी करता विचार करत असाल तर लगेच निर्णय घ्या कारण भावा अजून वाढण्याची शक्यता सध्या बाजार तज्ञांनी व्यक्त केली आहे. आणि हो लक्षात ठेवा आज सोन्याचा दर 90 हजारांच्या आसपास आहे तो कधी लाखांच्या वर जाईल हे सांगता येत नाही.

(Disclaimer: वरील दिलेले दर हे अंदाजे आहेत योग्य दर जाणून घेण्यासाठी आपल्याला जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा)

Leave a Comment

error: Content is protected !!