Shani Dev : शनी देव म्हणजे न्यायाचा देव. कर्मानुसार फल देणारा ग्रह. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता चांगल्या कर्मासाठी उत्तम यश आणि वाईट कर्मासाठी कठोर दंड हेच शनी महाराजांचं तत्त्व. पण माणूस आपल्या वागणुकीत चुका करत राहतो आणि शनी महाराज त्यावर लक्ष ठेवून असतात. अशा काही सवयी असतात, ज्या शनीला अजिबात मान्य नसतात. आणि हेच वर्तन संकटं ओढवून देतं. शनीच्या कोपामुळे जीवनात साडेसाती, ढैय्यासारखे काळ सुरु होतात आणि अनेकदा आयुष्य अडथळ्यांनी भरून जातं. Shani Dev
शनीचा कोप नेमका कोणावर?
ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष स्थान आहे. शनी जर कुंडलीत अशुभ स्थितीत असेल, तर तो व्यक्तीच्या आयुष्यात मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यसंबंधी मोठे अडथळे निर्माण करतो. काही वेळा हा काळ इतका त्रासदायक असतो की, व्यक्तीला वाटतं सर्व काही हातातून निघून जात आहे. पण हे अचानक होत नाही. काही चुकीच्या सवयी, वर्तन आणि विचारशैलीमुळे शनी रुसतो आणि मग त्याचा कोप सुरू होतो.
‘या’ सवयी शनीला अजिबात आवडत नाहीत
दुसऱ्याचं वाईट बघणं : ज्या लोकांना दुसऱ्याचं यश, समाधान आणि आनंद बघवत नाही, सतत द्वेष आणि मत्सर मनात बाळगतात अशा लोकांवर शनीचा कोप निश्चितच ओढावतो.
दिशाभूल करणे : एखादा व्यक्ती प्रगती करत असला, यशाच्या मार्गावर असेल, तरी त्याला अडवण्याचा प्रयत्न करणं, त्याचं मनोबल तोडण्याचं काम करणं हेही शनीला राग आणणारं वर्तन आहे.
जबाबदारी टाळणं : आपली चूक स्वतः न मानता नेहमी इतरांवर खापर फोडणारे लोक, आपल्या चुका लपवून दुसऱ्यांना दोष देणारे हे वर्तन शनीला अपमानास्पद वाटतं.
वाईट कामं करणं : चोरी, फसवणूक, भ्रष्टाचार, खोटं बोलणं, कोणाला दुखावणं हे सर्व प्रकार शनीच्या न्यायवृत्तीच्या विरोधात आहेत. अशा लोकांना शनी कधीच माफ करत नाही.
स्वतःला न समजणं : जे लोक आपल्या परिस्थितीचा स्वीकार करत नाहीत, नेहमी इतरांशी तुलना करत राहतात आणि स्वतःकडे सुधारणा करत नाहीत त्यांच्यावरही शनीचा रोष असतो.
साडेसाती आणि ढैय्या काय घडतं यामध्ये?
जेव्हा शनी ग्रह एखाद्या राशीवर अडीच वर्षांसाठी भ्रमण करत असतो, तेव्हा त्याला ढैय्या म्हणतात. आणि जेव्हा शनी एखाद्या राशीवर सात वर्षांचा प्रभाव टाकतो, तेव्हा त्याला साडेसाती म्हणतात. या काळात अनेकांना मोठ्या आर्थिक, वैयक्तिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. यश दूर जातं, नात्यांमध्ये कटुता येते आणि जीवन एकटीच्या लढाईसारखं वाटतं.
(Disclaimer | वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही.)