पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती..

PM Kisan Yojana: केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 19 हप्ते जमा झालेले आहेत. दरम्यान राज्यात मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांची लगबग खरीप हंगामाची पेरणी करण्याची आहे. पेरणीसाठी आवश्यक असणारे बी बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता भासत आहे. अशा वेळेस शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम मिळाली तर चांगलं होईल अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

पीएफ किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

खरीप हंगामाच्या पेरणीसाठी आवश्यक बी बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. सर्व शेतकऱ्यांना हाच प्रश्न पडला आहे की विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी मिळणार? दरम्यान या लेखांमध्ये आपण विसाव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. PM Kisan Yojana

शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यामध्ये बँक खात्यात जमा केले जातात. आता विसावा हप्ता लवकरच जारी केला जाणार आहे. ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत 19 हप्त्याचा लाभ मिळालेला आहे. 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांना 19 वा हप्ता देण्यात आला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या हप्त्याचे पैसे महाडीबीटी द्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले होते.

हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळवा दुप्पट नफा! ₹1 लाखाचे ₹2 लाख मिळतील…

विसावा हप्ता कधी मिळणार?

या योजनेचा विसावा हप्ता या महिन्यात म्हणजेच जून महिन्याच्या अखेरपर्यंत जमा केला जाऊ शकतो. सरकारने मात्र अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अनेकदा तांत्रिक किंवा कागदपत्राच्या कारणामुळे शेतकऱ्यांचे हप्ते अडकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन लाभार्थी स्थिती आणि पेमेंट स्थिती तपासून घ्यावी. त्यामुळे तुम्हाला तुमचे मागील हप्ते मिळाले आहेत का नाही आणि पुढील हप्त्याच्या काय समस्या असतील या सर्व गोष्टी समजतील. पी एम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा | सातबारा उताऱ्यांमधील चुकीच्या दुरुस्तीसाठी भूमी अभिलेख विभागाचा नवीन निर्णय! वाचा सविस्तर..

पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत जारी केलेले सर्व हप्ते चार महिन्याच्या अंतरावर देण्यात आले आहेत. सतरावा हप्ता जून 2024 मध्ये देण्यात आला होता. त्यानंतर चार महिन्याच्या अंतरावर अठरावा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये देण्यात आला. त्यानंतर पुढील चार महिन्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये या योजनेचा 19 वा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यानुसारून विसावा हप्ता पुढील चार महिन्याच्या अंतरानंतर म्हणजेच जून महिन्यात जारी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सरकारकडून हप्त्याची घोषणा केलेली नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती..”

Leave a Comment