सातबारा उताऱ्यांमधील चुकीच्या दुरुस्तीसाठी भूमी अभिलेख विभागाचा नवीन निर्णय! वाचा सविस्तर..

Satbara Utara: सातबारा उतारा मधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारे 155 कलमा बाबत तहसीलदारांवर आता नवीन निर्बंध लावण्यात आले आहेत. इथून पुढे 155 कलमाचे आदेश ऑनलाईनच करावे लागणार असून ऑफलाइन फेरफार करताच येणार नाहीत. असे स्पष्ट आदेश भूमी अभिलेख विभागाने जारी केले आहेत. या निर्णयामुळे या कलमाच्या नावाखाली करण्यात येणारे खोटे धंदे कायमचे बंद होणार आहेत.

आदेश फेरफरांची नोंद कशी व कोणी केली याची ऑनलाईन पडताळणी ही होणार असल्याने तलाठ्याकडून तहसीलदार पर्यंत सर्वांना डोळ्यात तेल घालून फेरफार नोंदी वहीत मुदतीत कराव्या लागणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने याबाबत सविस्तर परिपत्रक काढले आहे. यामध्ये या सर्व सूचनांचा अंतर्भाव केला आहे. या पूर्वीच्या तरतुदीनुसार केवळ हस्ताक्षर किंवा हस्तलिखितातील चुका महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या १५५ या कलमाद्वारे दुरुस्ती करता येत होत्या. Satbara Utara

हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत मिळणार पाच लाख रुपयांचा नफा; जाणून घ्या सविस्तर माहिती

या पद्धतीचे फेर आता ऑनलाईन होणार नाहीत

  • यावर नियंत्रण करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने आता कलम 155 नुसार काय करावे किंवा काय करू नये यासाठी स्वातंत्र परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार आता या कलमाचा वापर केल्यावर देण्यात आलेले आदेश ऑनलाईनच देण्यात येणार आहेत.
  • यापुढे एकही फेर आता ऑफलाइन नोंदविता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अर्थ न्यायिक तसेच महसूल न्यायाधिकरणाकडून देण्यात आलेल्या आदेशांच्या फेरफार नोंदी ही ऑनलाईन देण्यात येणार आहेत.
  • या फेरफार नोंदी ही एका दिवसातच कराव्या लागणार आहेत. महसूलच्या नोंदीसाठी वहीत मुदत मात्र पाळावी लागणार आहे. पूर्वी आदेश फेरफार केल्याची नोंद केली किंवा केली नाही याची माहिती ठेवली जात नव्हती.
  • आता तलाठ्यांच्या लॉगिनला आदेश मिळाल्यानंतर त्यांची नोंद केव्हा कशी व कोणी केली याची ऑनलाईन पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे नोंदी बंधनकारक करण्यात आले आहेत. पूर्वी यासाठी संबंधितांना तलाठ्याकडे हेलपाटे मारावे लागायचे मात्र आता यापुढे सर्व प्रक्रिया ऑनलाईन केले जाणार आहे.

कलम 155 च्या नोंदी आता ऑनलाईनच कराव्या लागणार आहेत. याची पडताळणी ही ऑनलाईन पद्धतीने केली जाईल. कामात कुचराई करणाऱ्या वर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आता फेर ओढताना प्रत्येकांना न चुकता व योग्य त्या पद्धतीने फेर ओढावे लागेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!