Post office scheme: आजकाल प्रत्येक जण सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असतात. सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिलं तर पोस्ट ऑफिस च्या योजनेकडे लोकांचा मोठ्या प्रमाणात कल दिसत आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनेत चांगला परतावा आणि सुरक्षित हमी दिली जाते. अशाच पोस्ट ऑफिसच्या योजनेपैकी एक म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच एन एस सी ही योजना अजूनही मध्यमवर्गीय आणि नोकरदारांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे त्यात सरकारी हमी आहे म्हणजेच गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आणि व्याजदर देखील चांगला मिळत आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत लोक पुन्हा एकदा एनएससी कडे वळत आहेत याचे कारण म्हणजे सुरक्षित आणि चांगला परतावा.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही एक भारतीय सरकारद्वारे समर्पित एक लघुबचत योजना आहे. ही योजना देशभरातील सर्व पोस्ट ऑफिस द्वारे चालवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिकांना दीर्घकालीन बचत करण्यासाठी प्रेरित करणे आहे. सध्या या योजनेअंतर्गत 7.70% व्याजदर दिला जातो. हा व्याजदर चक्रवाढ पद्धतीने आहे, परंतु पैसे परिपक्वता नंतर म्हणजेच पाच वर्षांनीच उपलब्ध होतात. म्हणजे जर तुम्ही एक लाख रुपयाचे एन एस सी घेतले असेल तर पाच वर्षांनी तुम्हाला सुमारे 1.45 लाख रुपये मिळतील आणि तेही पूर्णपणे सुरक्षित आणि कोणत्याही बाजारातील जोखीमय शिवाय. Post office scheme
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात या दिवसापासून होणार मुसळधार पाऊस…
पाच वर्षात किती नफा मिळेल?
समजा तुम्ही पोस्ट ऑफिस च्या एन एस सी मध्ये एकावेळी पाच लाख रुपये गुंतवले आणि व्याजदर 7.70% वार्षिक आहे. यामध्ये दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने व्याजदर वाढतो म्हणजे व्याजावर व्याज जोडले जाते. परंतु पाच वर्षांनी सर्व पैसे एकत्र तुम्हाला मिळतात. जर तुम्ही या योजनेत पाच लाख रुपये ऐवजी 10 लाख रुपये गुंतवले तर एकूण लाभ रक्कम 7.7% व्याजदर असं सुमारे चार लाख 48 हजार रुपये होईल. एन एस सी मध्ये कमाल गुंतवणूक मर्यादा नाही परंतु 80 सी अंतर्गत कर सुट फक्त 1.5 लाख रुपयापर्यंतच उपलब्ध आहे. किमान गुंतवणूक फक्त 1000 रुपये आहे. यामुळे कोणताही सर्वसामान्य माणूस या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतो. तुम्ही ते एकटे खाते देखील उघडू शकता. यामध्ये संयुक्त खात्यात तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा तुमच्या मुलाच्या नावाने खाते देखील तुम्ही उघडू शकतात.
1 thought on “पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत मिळणार पाच लाख रुपयांचा नफा; जाणून घ्या सविस्तर माहिती”