1 जुलैपासून बँकेच्या नियमात होणार मोठा बदल; हे नियम होतील आता लागू

Credit Card New Rules : बँकांनी सुरुवातीला गोड गोड दाखवून ग्राहकांची मन जिंकली, रिवार्ड पॉईंट्स, फ्री लाऊज, कॅशबॅक अशा गोष्टी देऊन लोकांना क्रेडिट कार्ड कडे वळवलं. पण आता हळूहळू चित्र बदलत चाललंय. आता बँकांना फायदा आणि ग्राहकांना मोठा फटका बसत चाललेला आहे त्यातच हा नवीन नियम तुमच्या खिशाला कात्री लावणारा ठरणार आहे. हे बदल ऐकून सामान्य माणूस विचार करेल “आता हे कशासाठी?” Credit Card New Rules

HDFC बँकेबाबत नवीन नियम

एक तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे जर तुमचे या बँकेत अकाउंट असेल, तर ही गोष्ट नक्की वाचा जर तुम्ही एमएल वगैरे किंवा इतर कोणत्याही गेममध्ये पैसे खेळायसाठी कार्ड वापरला तर आता चार्जेस लागणार आहे. जर एखाद्या माणसाने महिन्यात ₹10,000 पेक्षा जास्त गेमिंग प्लॅटफॉर्मवर खर्च केला, तर त्याच्याकडून 1% शुल्क घेतलं जाणार आहे. हे फक्त गेम वरच नाही, PayTM, Mobikwik, Ola Money वगैरे वॉलेटमध्ये पैसे टाकले तरी हे नियम होणार आहेत. महिन्यात ₹50,000 पेक्षा जास्त युटिलिटी बिल भरलं तर पुन्हा तेच 1% चार्ज. पण समाधानाची गोष्ट म्हणजे शाळा कॉलेजची फी थेट त्यांच्या वेबसाईटवरून भरली तर शुल्क नाही.

ICICI बँकेबाबत नवीन नियम

या आधी कुठेही गेलं की फुकट लाऊजमध्ये आराम, आता म्हणे तिमाही ₹75,000 खर्च केला नाही तर लाउंज नाही. आणि सरकारचे व्यवहार, शाळेची फी, EMI हे त्यात ₹75,000 मध्य धरायचं नाही! म्हणजे खरंतर दररोज खर्च होतो, पण नियम मात्र तिरकस

ATM वर ही शुल्क वाढले दुसऱ्या बँकेच्या ATM वर पैसे काढले की ₹23, बॅलन्स बघितला तरी ₹8.5 डेबिट कार्डचा वार्षिक शुल्कही ₹300, कार्ड हरवलं तरी तेवढेच.

या बदललेल्या नियमामुळे सर्वसामान्यांवरती नक्कीच परिणाम होणार आहे बँकेचे नियम सर्वसामान्यांचे डायरेक्ट खिशावरती परिणाम करत असतात परंतु आता येणाऱ्या काळात हे नियम ग्राहकांच्या खिशावरती किती परिणाम करतात हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!