लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे खटाखट 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का?

Ladki Bahin Yojana Scheme : महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. या योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडला होता. आता सर्व महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत गोरगरीब महिलांना देण्यात येते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते यानंतर महिलांना मे महिन्याचे पैसे कधी मिळतील असा प्रश्न पडत होता. दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती ट्विटरवर ट्विट करून दिली आहे. आज पासून महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सर्व माहिती लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. मे महिना उलटून गेला होता त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना 1500 रुपये कधी मिळतील असा प्रश्न निर्माण होत होता. मे महिन्याचा हप्ता कधी येणार जूनच्या हप्त्याचं काय असे अनेक प्रश्न महिलांना पडत होते. दरम्यान आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचे स्वतः अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा | पावसाचा जोर वाढणार! राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही? हे तुम्ही तुमच्या घरबसल्या चेक करू शकता. तुमच्या संबंधित बँकेच्या नेट बँकिंग साइटवर जाऊन तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही याची खात्री करू शकता. यासोबतच तुम्ही बँकेत जाऊन पासबुक वर एन्ट्री करून देखील तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नाही हे तपासू शकता. पासबुक वर तुम्हाला कधी किती पैसे मिळाले याच्याबाबत इंट्री दाखवली जाईल. तुमच्या खात्यात मे महिन्याचे पैसे जमा झाले असेल तर त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटला 1500 रुपये क्रेडिट झाल्याचे दाखवेल. त्यामुळे लाभार्थी महिलांनी जवळील बँकेत जाऊन आपल्या खात्यात पैसे जमा झाले का नाही याची खात्री करून घ्यावी.

लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांनी नियमा बाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू केली असून यातून तब्बल अडीच लाख सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत असे समोर आले आहे. मात्र आता त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. Ladki Bahin Yojana Scheme

हे पण वाचा | शिधापत्रिका धारकांसाठी मोठी बातमी! 3 महिन्याचे मोफत रेशन एकत्रित मिळणार; जाणून घ्या काय आहे योजन?

मात्र तरीदेखील राज्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान आता अर्जाची पडताळणी करून लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांची नवीन यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यात ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही त्या महिलांनी तुमचे नाव लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे असे समजून घ्यावे. ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत तरी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता आहे त्या महिलांचे पैसे या महिन्यापासून बंद करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर सध्या लाडकी बहीण योजनेचे अंतर्गत लाभ घेत असणाऱ्या महिलांच्या उत्पन्नाचे पडताळणी देखील केली जात आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी आहे त्यामुळे श्रीमंत महिलांनी या योजनेचा लाभ घेऊ नये यासाठी हा निकष ठेवण्यात आला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे खटाखट 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का?”

Leave a Comment

error: Content is protected !!