Gold Price Today: सोन्याचे दर मागील काही दिवसांपासून सतत वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करावा का नाही असा प्रश्न देखील सातवत आहे. आज चार जून रोजी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या घरात मोठा बदल झाल्याचा पाहिला मिळत आहे. दहा ग्रॅम साठी तब्बल हजारो रुपयांचा खर्च करावा लागत आहे. परिणामी, लग्नसराईत किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना बाजारात जाण्याआधीही अपडेट जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. Gold Price Today
जून महिना सुरू झालेला आहे म्हणजे पावसाची चाहूल, परंतु अशातच वातावरण गरम करणारी बातमी आली आहे. ती म्हणजे सोन्याच्या बाजारात मोठी वाढ झालेली आहे. गेल्या महिन्याच्या शेवटी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोने साठवण्याकडे कल वाढला असून आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीचा परिणाम देशांतर्गत दरांवरती स्पष्टपणे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर एक लाखांचा टप्पा गाठला असून आता पुन्हा एकदा ते त्याच दिशेने सरकत आहेत.
तीन दिवसात तब्बल इतकी वाढ 1 जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 97,130 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. त्यानंतर दोन जूनला दरात 1530 रुपयांचे थेट वाढ झाली,. तीन जूनला पुन्हा 220 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आणि दर 99 हजार 60 रुपयांवर पहोचले. आज चार जून रोजी दारात आणखी वाढ झाली असून 99170 रुपयांवरती दर आले आहेत.
महाराष्ट्रातील आजचे ताजे दर शहरानुसार
24 कॅरेट सोन्याचा दर ( प्रति 10 ग्रॅम) : मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, ठाणे – ₹99,170
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी – ₹99,200
22 कॅट सोन्याचा दर ( प्रति दहा ग्रॅम): मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, ठाणे – ₹90,900
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी – ₹90,930
18 कॅरेट सोन्याचा दर ( प्रति दहा ग्रॅम) : मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, ठाणे – ₹74,380
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी -₹74,410
वरचे दर पाहता सोन्याचा भाव लाखांच्या घरात पोहोचल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि उत्सुकता दोन्ही वाढले आहेत. लवकरच तो एक लाखांचा आकडा पार करेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यापूर्वी खरेदी करायचा सल्ला अनेक आर्थिक तज्ञ देत आहेत. त्यामुळे तुम्हीही जर सोनं खरेदीच्या तयारीत असाल, तर आजच दर लक्षात घेऊन निर्णय घ्या.
(Disclaimer: वरील दिलेले दर हे अंदाजे आहेत, योग्य दर जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.)
हे पण वाचा | सोन्याच्या भावात मोठी घसरण; 12 हजारांची घसरण होणार? तज्ञांचा मोठा अंदाज
1 thought on “Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी वाढ! महाराष्ट्रातील शहरानुसार भाव पहा”