राज्यामध्ये या तारखेला होणार पावसाची जोरदार बॅटिंग, पंजाबरावांचा मोठा अंदाज

Punjabrao Weather Forecast : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे, राज्यामध्ये पावसाला पुन्हा कधी सुरुवात होणार? असा प्रश्न मनामध्ये उपस्थित झाला असाल तर हा हवामान अंदाज नक्की वाचा. कारण शेतकऱ्याचे विश्वासू पंजाबराव डख (Punjab Dakh) यांनी नुकताच हवामान अंदाज वर्तवट राज्यातील हवामानाविषयी एक मोठा अंदाज वर्तवलेला आहे. मध्ये आगामी काळात कसा पाऊस पडणार व कोणत्या तारखेला पडणार शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचा सल्ला देखील त्यांनी दिलेला आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज

पंजाबराव यांनी त्यांच्या नवीन हवामान अंदाज मध्ये, महाराष्ट्रात जोरदार पावसाची बॅटिंग होणार असं म्हटलं आहे. राज्यात 13, 14, 15, 16, 17 जून रोजी जोरदार पाऊस होणार आहे. असं त्यांनी या हवामान अंदाज म्हटले आहे. तसेच, पंजाबराव यांनी शेतकऱ्यांना सहा तारखेपर्यंत शेतातील कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचे सांगितले आहेत. कारण सात, आठ, नऊ या तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा दहा, अकरा, बारा या तारखेपर्यंत पावसाची विश्रांती असेल तोपर्यंत पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी शेतातील कामे करायचे आहे. तसं ते म्हटले की हा पाऊस सर्व दूर पडणार नसून भाग बदलत पडणार आहे. Punjabrao Weather Forecast

तसेच ते म्हटले 13 जून ते 17 जून दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होणार आहे. हा पाऊस नुसता पाऊस नसून अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार आहे. तसेच पुढे बोलत असताना ते म्हणाले राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडल्यास मोठी परिस्थिती उद्भवू शकते जसे की पूर परिस्थिती आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

तसेच पंजाबराव म्हणाले पेरणी करताना शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील योल पाहून पेरणी करावी अन्यथा करू नये पावसाची वाट पहावी. पंजाबराव यांचा हवामान अंदाज तुम्ही सविस्तरपणे खाली पाहू शकता.

हे पण वाचा | पुढील 4 तासांमध्ये राज्यातील या भागात होणार मुसळधार पाऊस! हवामान खात्याचा नवीन इशारा

Leave a Comment

error: Content is protected !!