शिधापत्रिका धारकांसाठी मोठी बातमी! 3 महिन्याचे मोफत रेशन एकत्रित मिळणार; जाणून घ्या काय आहे योजन?

Ration Card New Updates: शिधापत्रिका धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गोरगरीब नागरिकांसाठी जीवनाचा आधार ठरणाऱ्या सार्वजनिक वितरण संस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. यंदा मान्सूनच्या काळात रेशन वितरणात अडथळा येऊ नये म्हणून केंद्र सरकारने या योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जूनमध्ये पुढील तीन महिन्याचे म्हणजेच एकूण जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 चे रेशन एकाच वेळी मिळणार आहे.

देशातील गोरगरीब नागरिकांना खाण्यासाठी स्वस्तात धान्य देण्यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अतिशय कमी किमतीत नागरिकांना अन्नधान्य दिले जाते. कोरोना काळामध्ये हे अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यापासून आत्तापर्यंत देशातील नागरिकांना रेशन मोफतच दिले जात आहे. सध्या देशातील सुमारे 80 कोटी लोकांना दरमहा पाच किलो तांदूळ व गहू मोफत दिले जात आहेत. अंत्योदय अन्न योजना अंतर्गत अधिक गरजूंना दरमहा 35 किलो दान्य दिले जाते. मात्र मान्सून मध्ये पुरवठा साखळी खंडित होण्याची शक्यता होऊ शकते. यामुळे सरकारने हे धान्य पुढील तीन महिन्यासाठी अगोदर देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदा बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार ₹3,000? मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र

किती धान्य मिळणार?

  • PM–GKAY अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला तीन महिन्यासाठी 15 किलो धान्य मिळणार आहे.
  • AAY लाभार्थी कुटुंबाला 105 किलो धान्य मिळणार आहे. Ration Card New Updates

ही रेशन योजना 31 मे 2019 पर्यंत सुरू असून आवश्यकतेनुसार या माध्यमातून दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोफत रेशन मिळवण्यासाठी अटी काय?

  • आधार लिंकिंग: रेशन कार्ड धारक कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
  • ई–केवायसी पूर्ण करणे: आधारित बायोमेट्रिक केवायसी करणे आवश्यक आहे. ते 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण केलेले असावे.
  • तीन वेळा बायोमेट्रिक करावी: तीन महिन्याच्या रेशनासाठी तीन वेळा बायोमेट्रिक तपासणी करावी लागेल.

हे पण वाचा | आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होणार; यादीत तुमचे नाव आहे का नाही? पहा..

ई–केवायसी कशी करावी?

ऑफलाइन:

  • जवळील रेशन वितरण केंद्रामध्ये जा.
  • आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • रेशन दुकानाच्या e–POS मशीन द्वारे बायोमेट्रिक सत्यपण करा.

ऑनलाइन:

  • तुमच्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर त्या ठिकाणी e–kyc या पर्यायावर क्लिक करा.
  • रेशन कार्ड क्रमांक टाका आणि ओटीपी टाका.
  • Mere eKYC किंवा आधार फेस आरडी ॲप वरून चेहरा ओळख करा.
  • रेशन कार्ड ची केवायसी करण्यासाठीची ही सेवा संपूर्ण देशभरात उपलब्ध असून, तुम्ही वन नेशन वन रेशन योजनेमुळे कोणत्याही राज्यात रेशन मिळवू शकतात.

हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेतून 19 लाखाहून अधिक महिला अपात्र; तुम्ही या सरकारी पडताळणीत आलात का?

आवश्यक कागदपत्रे

  • रेशन कार्ड
  • घरातील सर्व सदस्यांच्या आधार कार्ड
  • आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर

राज्यात मान्सून सुरू होणार आहे या काळामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे सर्वसामान्य गरीब नागरिकांना उपासमारी सारखी समस्या येऊ नये यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र लाभ घेण्यासाठी केवळ ई-केवायसी पूर्ण करणे आणि आधार लिंकिंग करणे आवश्यक आहे. यामुळे रेशन कार्ड धारकांनी आवश्यक त्या वेळेत अन्नसुरक्षा मिळेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “शिधापत्रिका धारकांसाठी मोठी बातमी! 3 महिन्याचे मोफत रेशन एकत्रित मिळणार; जाणून घ्या काय आहे योजन?”

Leave a Comment

error: Content is protected !!