नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ होणार; नमोचा पुढील हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर…

Namo Shetkari Yojana: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना यापुढे सहा हजार रुपये ऐवजी वार्षिक 9000 रुपये देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यापूर्वी दिले होते. योजनेचा पुढील हप्ता खरीप हंगामापूर्वीच शेतकऱ्यांना मिळेल असे सांगितले होते. मात्र यासाठी अतिरिक्त 3000 कोटीची तरतूद न झाल्याने या योजनेच्या आश्वासनाबाबत सरकारकडून कोणतीही हालचाल झाल्याचे दिसत नाही.

दरम्यान या दोन्ही योजनेसाठी शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक करण्यात आले आहे. नमो शेतकरी सन्माननिधी योजनेसाठी अजून याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे. नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेत सातव्या हप्ता साठी राज्यात 93 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या वितरणाप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्माननिधी योजनेच्या लाभार्थ्यांना तीन हप्त्यात दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांमध्ये आणखीन तीन हजार रुपयाची भर घालू, यामुळे दोन्ही योजनेतून शेतकऱ्यांना बारा हजार रुपया ऐवजी 15 हजार रुपये मिळतील. असे आश्वासन देण्यात आले होते.

हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेतून 19 लाखाहून अधिक महिला अपात्र; तुम्ही या सरकारी पडताळणीत आलात का?

त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा हप्ता खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू असे देखील आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र या आश्वासनाविषयी राज्य सरकारच्या कोणत्याही हालचाली दिसत नसून या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार व वाढीव रक्कम कधी मिळणार याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आली नाही. नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचा सातवा हप्ता जून महिन्यातच मिळणार आहे. राज्यात मान्सून दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर दाखल झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. Namo Shetkari Yojana

राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते खरेदीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा व नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या पैशाचा उपयोग होईल. असे शेतकऱ्यांना वाटते मात्र अजून या दोन्ही योजनेच्या हप्त्याविषयी कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. या योजनेतील शेतकऱ्यांना वार्षिक तीन हजार रुपयाची वाढ करायची असल्यामुळे तीन हजार कोटीची तरतूद नुकताच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. त्यामुळे राज्य राज्य सरकारला अतिरिक्त 3000 कोटीचा भर कसा घालता येईल. याकडे कृषी विभागाचे लक्ष असून नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा सातवा हप्ता 93 लाख 721 शेतकऱ्यांना मिळणार आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणीच्या खात्यात ₹1500 रुपये नाहीतर, डायरेक्ट ₹3000 रुपये जमा होणार! वाचा सविस्तर माहिती

यामध्ये शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले नाही. याबाबत राज्य सरकारने अजून कोणत्याही शेतकऱ्यांना सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे सूचना आल्यानंतर केवळ शेतकरी ओळखपत्र असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा पुढील हप्ता दिला जाणार आहे. अशी माहिती कृषी विभागाने प्रसारमाध्यमांना दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम किसान योजनेच्या आधारे सुरू केलेली नमो शेतकरी महासंघ निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये ऐवजी नऊ हजार रुपये देऊ असे आश्वासन दिले होते, मात्र अजून देखील त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ होणार; नमोचा पुढील हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर…”

Leave a Comment

error: Content is protected !!