Gold price 66 years ago : सध्या सोन्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे, गेला याचा अनुभव आपण सर्वांनाच पाहिला आहे. एकेकाळी लग्नकार्य असो वा गुंतवणूक, लोक सहजपणे सोना खरेदी करायचे. मात्र आज त्याच सोन्यासाठी सामान्य माणसाला खिसा रिकामा करावा लागतोय. आजच्या घडीला एक तुळसून खरेदी करायचं म्हटलं तरी जवळपास लाख रुपये मोजावे लागतात.
पण जर आपण तुम्हाला सांगितलं की एकेकाळी हाच तोळा अवघ्या शंभर रुपयांच्या आसपास मिळत होतं, तर? विश्वास बसणार नाही ना? पण हे खरं आहे. सध्या सोशल मीडियावरती असाच एक फोटो व्हायरल होतोय ज्यामध्ये 1959 साली एक तोळे सोन्याची किंमत अवघी 113 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. Gold price 66 years ago
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक
सोन्याचा जुना दर पाहून लोकांमध्ये चक्कीत होण्याची लाट
सध्या इंस्टाग्राम वरती @upscworldofficial या पेजवरून एका जुना फोटो शेअर करण्यात आलेला आहे. हा फोटो 1959 मधील एका ज्वेलरी दुकानाच्या बिलाचा आहे. या बिलामध्ये वामन निंबाजी अष्टेकर नावाच्या दुकानाचा उल्लेख आहे. ग्राहकाचे नाव शिवलिंग आत्माराम असे नमूद करण्यात आलेले आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बिलात एक तोळा म्हणजे दहा ग्रॅम सोन्याची किंमत फक्त 113 रुपये नमूद करण्यात आली आहे. म्हणजे आज जिथे एक तुळस होणं खरेदी करायला 97 हजार रुपये लागतात, तिथे 66 वर्षापूर्वी हेच सोनं अवघ्या शंभर ते सव्वाशेर रुपयांच्या घरात मिळत होतं!
2025 मध्ये सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहे
आपण पाहतच आहोत की गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरामध्ये प्रचंड चढ-उतार सुरू आहे. एप्रिल महिन्यात तर 22 तारखेला 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख एक हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काही काळातच तो एक लाखांच्या खाली आला आहे. मे महिन्यात सोन 99 हजारांच्या आसपास होतं. आणि आजही सरासरी भाव 97 हजारांच्या पुढे जातोय. म्हणजे गेला 66 वर्षात सोन्याचा दर 113 रुपयांवरून थेट आता एक लाख रुपयांच्या घरात वाढलेला आहे. आणि हे वाढलेले दर पाहता सर्वसामान्य खरीददारांसाठी सोन आता स्वप्नासारखा वाटू लागलेला आहे.
मेकिंग चार्जेस वगळता एवढं स्वस्त सोन?
आज आपण एखादं दागिने घेतलं केवळ सोन्याच्या दररोज नाहीतर त्यासोबत मेकिंग चार्जेस, जीएसटी यामुळे एकूण रक्कम आणखी वाढते. पण 19 59 मधील या जुन्या बिलामध्ये केवळ सोन्याचा दर नमूद आहे आणि तो कोणताही मेकिंग चार्जेस नव्हता. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करायचे. याचा पुर्वा म्हणजे हे व्हायरल बिल आहे.
नेटकर यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
हे जुना बिल पाहून अनेकांनी मजेशीर कमेंट केले आहेत. “आज हे बिल बँकेत ठेवायला पाहिजे” “113 रुपयात आता दहा ग्रॅम सोन नवे तर पीठ सुद्धा येणार नाही” “किती दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण तेव्हाच कळ अनुभवू शकलो नाही” अशा भावना अनेकांनी व्यक्त केले आहेत. काही नाही तर जुन्या काळातील हिशोब टाकून पहिलं आणि म्हटलं की आजच्या भावानुसार जर तोच ग्राहक 113 रुपयांमध्ये एक तोळा सोना घेत असेल तर आज तो कोट्याधीश असता!
हे पण वाचा | सोने खरेदी करण्याचा विचार करताय? लगेच जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर