या तीन राशींना सुरू होणार जून महिन्यात कठीण काळ कोणत्या आहेत राशी पहा!

Shani Transit 2025 : जून महिना सुरू झालाय, आणि यंदा तो फक्त उकाडा, व्रत-उपवास, सण-वारांनी भरलेला नाही, तर एक अत्यंत प्रभावशाली खगोलीय घडामोडही घेऊन आलाय आणि ती म्हणजे शनिदेवांचं नक्षत्रांमधून होणारं विशेष भ्रमण. लोकांनी उगाच हलकं घेऊ नये, कारण हा फेरफटका थेट आपल्या आयुष्याच्या दिशा बदलू शकतो. ह्या काळात काही राशींच्या लोकांना एकप्रकारे ‘अग्निपरीक्षा’ द्यावी लागणार आहे यातून कोणी निखाऱ्यांसारखा शुद्ध होईल, तर कोणी राख होऊन बसेल… हे सगळं अवलंबून आहे त्यांच्या विचारांवर आणि निर्णयांवर! Shani Transit 2025

हे पण वाचा | 2027 पर्यंत या राशींचे नशीब बदलणार, शनी देणार नुसता पैसा! या तीन राशी आहेत भाग्यवान

शनी कोण? फक्त ग्रह नव्हे… कर्माचा हिशोब घेणारा देव!

शनी हा फक्त एक ग्रह नाही, तो एक न्यायमूर्ती आहे. तो नुसतं बघत नाही, तो तुमच्या कर्मांचं फळ काटेकोरपणे देतो. जर चुकलात, तर क्षमा नाही आणि मेहनत केली तर उधळूनही देतो. ७ जून २०२५ ला पहाटे ४.४५ वाजता शनिदेव उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत. हे नक्षत्र शनीचंच असून ते मीन राशीत आहे. त्यामुळे या वेळी शनीचं भ्रमण म्हणजे शुद्ध कर्मदंडाची वेळ आहे असं मानलं जातं.

पण या नक्षत्र प्रवेशाचा सर्वात जास्त परिणाम कोणावर? चला जाणून घेऊया त्या ‘तीन’ राशी ज्या शनीच्या लक्षात आहेत आणि ज्यांच्या साठी जून महिना अतिशय काळजीचा ठरणार आहे

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांनी यंदा फारच सावध राहावं लागणार आहे. नोकरी बदलायची असेल तरी एकदाचं पाणी पाहूनच उडी घ्या. या काळात गडबडीत घेतलेला निर्णय भविष्य अंधारात टाकू शकतो. काहींना वाटेल, आता नवीन काहीतरी करावं पण जरा थांबा. शनीचा धोका असा असतो की, तो तुमच्या विनोदालाही चूक ठरवतो आणि त्याचा विपरीत अर्थ निघतो. नातेसंबंधांमध्ये गैरसमज, मालमत्तेवरून कुटुंबात वाद, खर्चाचं नियोजन बिघडणं हे सगळं टाळायचं असेल तर संयम हाच मंत्र!

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या अहंकाराला आवर घालणं फार महत्त्वाचं आहे. ‘मी सांगतोय म्हणजे बरोबरच’ हा दृष्टिकोन जिथं काम करत नव्हता तिथं आता संपूर्ण अपयश ठरू शकतो. नोकरदारांनी खर्चावर कंट्रोल ठेवलं नाही, तर आर्थिक संकट डोक्यावर येईल. व्यवसायिकांनी नवीन गुंतवणूक टाळावी. काही जणांना गाडी घ्यायची घाई असेल, तर थांबा… कारण शनीचा प्रभाव असा असतो की, ती गाडी सुख न देता त्रासच देईल. अपघाताचे योग निर्माण होत आहेत.

मीन (Pisces)

मीन राशीवर शनीच्या भ्रमणाचा फार खोल परिणाम होणार आहे. हा काळ फसवणुकीचा आहे, विशेषतः भागीदारीतील व्यवहार करताना. एखाद्या ओळखीच्या माणसावर विश्वास ठेवून जर डोळे झाकून पैसे गुंतवले, तर नुकसान निश्चित आहे. प्रेमसंबंधात भ्रम, गैरसमज, वाद आणि तुटकेपणा जाणवेल. तरुणांनी विशेष काळजी घ्यावी, कारण मानसिक दडपण खूप वाढू शकतं. थोडीशी निराशा आली, की लगेच नैराश्याच्या गर्तेत जाण्याची शक्यता आहे.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसार माध्यमांच्या आधारे आहे आम्ही कुठलाही प्रकारचा दवा करत नाही. महाराष्ट्र बातमी वरती दिलेला लेख फक्त माहिती पुरता असतो कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही)

Leave a Comment

error: Content is protected !!