Rain Update : राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट तुमच्या जिल्ह्याच नाव आहे का पहा


Rain Update : राज्यातील अनेक जिल्ह्यात आज हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. या परिस्थितीत आपली व आपल्या गुरडोराची आवश्यक काळजी घ्यावी.

राज्यात यंदा मान्सूनने धडाकेबाज सुरुवात केली आहे. रविवारी रात्रीपासूनच काही भागांत झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केलं आहे. रस्ते पाण्याखाली गेलेत, घरात पाणी शिरलंय, तर काही ठिकाणी छोटेखानी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसारख्या शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे लोकांची मोठी त्रेधातिरपीट उडाली आहे.Rain Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक

या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील ३ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काहींना ऑरेंज आणि यलो अलर्ट. नागरिकांनी काळजी घ्यावी, सुरक्षित स्थळी राहावं आणि गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

जिल्हानिहाय अलर्ट तपशील:

रेड अलर्ट (अतिवृष्टीचा धोका): रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा

ऑरेंज अलर्ट (मोठा पाऊस): पुणे घाटमाथा, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, रायगड

यलो अलर्ट (सावधगिरी): मुंबई

मुंबईत पावसासोबतच हायटाइड येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सावध राहावं.

शासनाने देखील या परिस्थितीमध्ये “भारतीय हवामान खात्याने पुढील २४ तासात आपल्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. मंत्रालय” असा मेसेज पाठवला आहे.

हे पण वाचा | Maharashtra Rain Alert : राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट! नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज

2 thoughts on “Rain Update : राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट तुमच्या जिल्ह्याच नाव आहे का पहा”

Leave a Comment

error: Content is protected !!