Rain Alert : सध्या राज्यातील वातावरण पाहता असं वाटतंय की मे महिना म्हणजे पावसाळाच आलाय. यावेळेस मे महिन्यात दररोज आपल्याला वेगवेगळ्या वातावरण पाहायला मिळाले खरंतर पावसासाठी हे खास होतं. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये असताना आभाळ मात्र पुन्हा एकदा ढगांनी भरून आलय. एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस मिळाला यामुळे शेतकऱ्यांना देखील धडकी भरली आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने 24 ते 28 मी दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे गावेगाव शेतकरी, नागरिकांनी व व्यापारी सगळे चिंतेमध्ये आलेले आहेत. Rain Alert
महाराष्ट्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा क्षेत्र तयार, राज्यात पाऊस वाढणार
हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्याच्या दक्षिण कोकण किनारपट्टीवर पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यात पार्श्वभूमी वरती रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे या जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे. परंतु या सर्व पार्श्वभूमी वरती नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे तर शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. अचानक कुठेही मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यामुळे पूर परिस्थिती आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
मान्सून कुठपर्यंत आला!
यंदाचा मान्सून वेळेपूर्वीच भारतामध्ये दाखल होणार असल्याचे चिन्ह पाहायला मिळत आहे. तर केरळच्या दिशेने मान्सूनचा प्रवास सुरू झाला असून पुढील दोन दिवसांमध्ये तो केरळमध्ये प्रवेश करेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. तर याच दरम्यान नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्राच्या दक्षिण भागातून मालदीव, लक्षदीप, कर्नाटक मध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण ढगाळ असून, पावसाची शक्यता वाढलेली आहे.
या अवकाळी पावसाने ग्रामीण भागात मोठा फटका
बुलढाणा, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर अशा भागांमध्ये येत्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे आणि त्यांच्या वरती अत्यंत कठीण मिळाली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आधीच भाव मिळत नाही त्यात हमीभावाचा संकट सततचा पाऊस शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेला आहे. “तुम्ही आम्ही रात्री दिवस मेहनत करून जे कांद्याचे पीक घेतलं, त्यावरती आभाळ दाटून आले”असे का शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यांच्या भावना ऐकून मनामध्ये खूप दुःख निर्माण झाला आहे. शासनाने देखील अशा शेतकरी बांधवांना मदतीचा हातभार पुढे करावा.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढे चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यानुसार जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तुवली आहे. तर काही ठिकाणी विधानच मोठं प्रमाण असू शकतं. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरातच राहावं, प्रवास टाळावा आणि सरकारचे किंवा प्रशासनाचे सूचना लक्षपूर्वक पाळाव्या, असावं करण्यात आला आहे.
हे पण वाचा | महाराष्ट्रावरती अवकाळीच मोठा संकट! हवामान खात्याने या जिल्ह्यांना दिला विशेष इशारा
1 thought on “Rain Alert : राज्यावरती मोठ संकट! होणार मुसळधार पाऊस शेतकऱ्यांनो सावधान”