Unseasonal rain | राज्यात होणार ढगफुटी सारखा पाऊस! हवामान खात्याचा मोठा इशारा! शेतकऱ्यांनो सावधान रहा!


Unseasonal rain : मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची फजिती उडाली आहे. अशातच परिस्थिती अधिकच गंभीर होत चालल्याने शेतकऱ्यांना काय कराव असा सुचत नाही राजाध अनेक जिल्ह्यात खरोखरच ढग फुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड, पुणे, कोल्हापूर, शिर्डी, रायगड या जिल्ह्यामध्ये तर जोरदार पावसाने जनजीवन विस्कळी झाल आहे. काही भागात नदींना पूर तर नाल्यांना पूर आल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. राळ सांगवी ( आष्टी, बीड) परिसरामध्ये आलेल्या ढग फुटी मुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, फुल पाण्याखाली गेल्याने चार गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना हाल सहन करावा लागत आहे.

बीड येथील शिरूर तालुका, सकाळ धरूनच इथे कडक ऊन आणि दमट वातावरण निर्माण झालं होतं परंतु दुपारून ही परिस्थिती बदलली आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली सध्या शिरूर तालुक्यातील शहरामध्ये आणि इतर भागात लगत गावांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

हे पण वाचा | राज्यात पुढील 10 दिवसांत पडणार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस! या भागातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

शिर्डी शहरात अचानक विजानसह आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असून, नागरिकांची तारामबाळ उडाली आहे. कोल्हापुरात ही वादळी वाराणसह पावसाचा जोर कायम असून, ग्रामीण भागात झाडे पडण्याची घटना समोर येत आहे. वीज गळतीमुळे जनतेचा जीव टांगणीला लागला आहे.

या 29 जिल्हा ना अलर्ट

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा आशा 29 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अंदाजानुसार वादळी वारे, मेघा गर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याच्या आव्हान करण्यात आले आहे.

हवामान खात्याचा अंदाज ठरत असतो अचूक

गेला काही दिवसांमध्ये हवामान खात्याने वेळेवर दिलेल्या अलर्टमुळे अनेकांचे प्राण वाचले असून, प्रशासन सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र हवामानात सुरू असलेली ही अस्थिरता पाहता नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं ठरत आहे. पुढील काही दिवसात पावसाचा जोर अधिक वाढू शकतो, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पातळीवर काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

हे पण वाचा: राज्यात पुढील 10 दिवसांत पडणार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस! या भागातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Leave a Comment

error: Content is protected !!