Cabinet decision : मुंबईत आज राज्य मंत्रिमंडळाचे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून बैठकीमध्ये राज्य सरकारकडून तब्बल आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. क्या बैठकीचा विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे प्रभावशाली प्रतिनिधी छगन भुजबळ यांना मंत्रीपद भेटले आहे. त्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर लगेच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली. सध्या त्यांच्याकडे कोणतेही खात देण्यात आलं नसून, अन्न व नागरी पुरवठा विभाग त्यांच्याकडे सोपवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Cabinet decision
दरम्यान, आजच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय ठरला तो राज्याचे नाव गृहनिर्माण धोरण जाहीर करण्याचा. “माझे घर माझे अधिकार” या ब्रीदवाक्याखाली साकारल्या जाणाऱ्या या धोरणांतर्गत 70000 कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक गृहनिर्माण खात्यामार्फत करण्यात येणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसनासोबतच शहरांच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी एक सर्वांगीण आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात राहणाऱ्या गोरगरीब जनतेसाठी स्वतःच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे.
या बैठकीत घेतलेली इतर महत्वाचे निर्णय खालील प्रमाणे
- न्याय विभाग: वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरावर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी 28 नवीन पदांची निर्मिती केली जाणार असून 1.76 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
- नगर विकास विभाग: मुंबईतील देवणार येथील भूखंड महानगर गॅस लिमिटेड बायोमिथीनेस तंत्रज्ञानाचा वापर करून कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पासाठी भाडेपट्ट्याने सवलतीच्या दरात दिला जाणार आहे.
- उद्योग व कामगार विभाग: धोरण कालावधी संपल्यांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजूर देण्यात आली.
- जलसंपदा विभाग चार प्रकल्प मंजूर : फुलवाडे जामफळ कनोली योजना धुळे: 5329.46 कोटी खर्च मंजुरी, 52,720 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार.
- अरुणा मध्यम प्रकल्प : 2025.64 कोटी खर्चास मंजुरी, 5310 हेक्टर सिंचन क्षमता.
- पोशीर प्रकल्प (Raigad) : 6394,13 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता.
- शिलार प्रकल्प (Raigad) : 4769.72 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
राजकीय सिंचन योजनांवर लाखो कोटींची गुंतवणूक करून शेतीला पाणीपुरवठा आणि सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने या बैठकीत विशेष भर दिल्याचा दिसून आल आहे. हे सर्व निर्णय ग्रामीण व शहरी भागात विकासाची नवी दिशा ठरणारे ठरणार आहेत अशी सरकारची भूमिका आहे.
राजकारन, प्रशासन आणि विकास या सर्व क्षेत्रात आजचा दिवस राज्यासाठी निर्णायक ठरल्याचे चित्र आहे. विशेषता छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशामुळे ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे पण वाचा | महत्त्वाची बातमी ! मंत्रिमंडळ बैठकीत मोठे सहा निर्णय वाचा सविस्तर माहिती