राज्यात पुढील 10 दिवसांत पडणार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस! या भागातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather News : राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. आणि आता तर मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच राज्यात पावसासाठी पोषक वातावरण बनला असून अनेक ठिकाणी पावसाला हजेरी लावलेल्या आता मे महिन्याचे शेवटची काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत कारण आता जर हा अवकाळी पाऊस थांबला नाही तर शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी वेळ मिळणार नाही आणि मान्सून सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची चांगलीच फजिती उडणार आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होतो आता ही वेळ पेरणीची तर नाही ना ते मी आता करून घ्यावी का असा प्रश्न उपस्थित झाला आहे परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या भागातील वातावरणाचा अंदाज आणि शेतीचे ओलावा व्यवस्थित प्रमाणे चेक करून पुढील नियोजन करावे आणि हवामान अंदाज आकडे लक्ष ठेवावे.Maharashtra Weather News

सध्या कर्नाटकच्या सीमेलगत अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हवामानाची चक्र बदलले असून, दहा दिवसात मुसळधार ते अति मुसलदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. विशेष म्हणजे, 21 मी पासून ते थेट 31 मे पर्यंत मुंबई सह कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच अवकाळी पावसाने फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांचे चिंतेमध्ये आणखी वाढ झाली आहे.

या भागात होणार मुसळधार पाऊस!

ज्येष्ठ हवामान तज्ञ, माणिकराव खुळे यांनी सांगितले की, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे तीन दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव राहणार आहे. तसेच नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा,  सांगली, कोल्हापूर यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सोबत धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड यासारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर पाहिला मिळणार आहे.

मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात घसरण, उन्हाचा तीव्रपणा कमी

या वळवाच्या पावसामुळे राज्यात कमल तापमानात लक्षणीय घट पाहायला मिळाले आहे. रात्रीचे तापमान ही सरासरीच्या खाली असल्याने हवामानात गारवा निर्माण झाला आहे. सध्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात ही लोकांना उन्हाचा तडाका बसत होता परंतु आता त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे, हेच पावसाचे दिवस शेतकऱ्यांसाठी आता चिंतेचे कारण बनले आहेत.

27 हजार हेक्टर पिकांचा नुकसान; सरकारकडून पंचनामे यांच्या आदेश

राज्यामध्ये अवकाळी पावसाने आधीच मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचे नुकसान केले आहे अशातच इयत्ता अमरावती जिल्ह्यामध्ये 13000 हेक्टर क्षेत्रावरील पिके उध्वस्त झालेली आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 5,850 हेक्टर वरील शेती पावसामुळे बाधित झाली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, एकूण 27 हजार हेक्टर शेती क्षेत्रावरील या पावसाचा फटका बसला असून, तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

राज्यामध्ये 31 मे पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी कुठलीही नवीन लागवड करताना शेतात काम करताना किंवा खतांची फवारणी करताना हवामान खात्यांच्या सूचनाकडे लक्ष द्यावे अन्य आवश्यक जोखीम टाळावी, असे आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

हे पण वाचा | Monsoon Rain | राज्यात या तारखेला दाखल होणार मान्सून; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट्स!

2 thoughts on “राज्यात पुढील 10 दिवसांत पडणार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस! या भागातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा”

Leave a Comment

error: Content is protected !!