मे महिन्यात या महिलांना तीन हजार रुपये मिळणार? काय आहे कारण जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक आधार देणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांना दीड हजार रुपये मिळतात. परंतु एक नवीन हाती अपडेट आल्यानुसार, मे महिन्यात तब्बल तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. गेला काही दिवसांपासून अनेक महिलांना आतुरता लागली होती की, यावेळी हप्ता केव्हा येणार, काहींच्या खात्यात एप्रिल चा हप्ताही आला नाही. आता सरकारकडून स्पष्ट झालय की ज्या महिलांना मागील महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यांच्या खात्यात एप्रिल आणि मे असे दोन हप्ते म्हणजे एकूण तीन हजार रुपये एकत्रित जमा होणार आहेत. Ladki Bahin Yojana

खेड्यापाड्यातले अनेक घरांमध्ये हाच एकमेव असा निश्चित आर्थिक आधार बनला आहे. शेतमजूर करणाऱ्या महिला, विधवा, घटस्फोटीत किंवा कोणतही निश्चित उत्पन्न असलेल्या बहिणींचा जगणं या योजनेच्या हप्त्यावरती अवलंबून असतं. एप्रिल महिन्यात अनेक महिलांच्या खात्यावर पैसे आले नाहीत, काहींची खातं आधारला लिंक नव्हतं, काहींची केवायसी झाली नव्हती. मग त्यांनी बँकेत फेऱ्या मारल्या, गावच्या तलाठ्याकडून पत्रक मागवली, महिला बालकल्याणाच्या कार्यालयात चौकशी केली. तरी हप्ता आला नाही म्हणून निराश झाले.

पण आता आपल्याला समजतंय की सरकारकडून अशा सर्व महिलांची यादी वेगळी तयार करण्यात आली आहे आणि त्यांना मे महिन्यात दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता दिला जाणार आहे. म्हणजे ज्यांना एप्रिलचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत. आणि ज्या महिलांना नियमितपणे पैसे मिळतात, त्यांना यावेळी पंधराशे रुपये मिळणार आहे. या योजनेचा हप्ता 25 मे पासून टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात होईल आणि 31 मे पर्यंत सगळ्या पात्र महिन्यांच्या खात्यात पैसे येतील, असं अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

सध्या संपूर्ण राज्यात 2.52 कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यांच्या आयुष्यात दर महिन्याला येणारे हे 1500 रुपये म्हणजे छोटसं पण महत्त्वाचे योगदान असतं. कोणाच्या घरात गॅस भरण्यासाठी उपयोगी होतो, कोणाच्या मुलाच्या शाळेच्या फिल हातभार लागतो, तर कुणी किराणा आणतो, औषधे घेतात. त्यामुळे आत्ता वेळेवर निर्णय हे महिलांसाठी मानसिक आणि आर्थिक दोन्हीही दृष्टिकोनातून फार गरजेचं असतं.

गेल्या महिन्यात जेव्हा हप्ता वेळेवर आला नाही, तेव्हा अनेक महिलांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. “साहेब अजून काही दिवस पैसे मिळाले नाही तर संसार कोलमडेल” असे एक वृद्ध मावशी बँकेत रांगेत उभ राहून सांगितलं होतं. तिच्यासारख्या हजारो महिलांसाठी आता सरकारने पुन्हा आशेचा किरण दाखवला आहे. आता हप्ता वेळेवर मिळेल अशी अपेक्षा आहे.

महिला वाचकांसाठी एक विनंती आहे जर तुमचं बँक खाते आधार लिंक नसेल, केवायसी पूर्ण नसेल, तर त्वरित प्रक्रिया पूर्ण करा. कारण अशा कारणामुळेच काही जणांचे हप्ते अडकतात. आणि जर तुम्हाला अजूनही मागील महिन्याचा हप्ता मिळाला नसेल, तर तुमच्या जवळच्या महिला बालविकास कार्यालयात किंवा ग्रामसेवकाकडे याबद्दल माहिती घ्या.

(Disclaimer : वर दिलेली माहिती विविध प्रसार माध्यमांच्या आधारे आहे. याबाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही. योग्य माहिती जाणून घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवा.)

हे पण वाचा | लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 11 वा हप्ता, वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!