IMD weather forecast : महाराष्ट्रसह ‘या’ राज्यांवरती मोठे संकट! हवामान खात्याची मोठी अपडेट वाचा सविस्तर माहिती


IMD weather forecast : देशभरात सध्या हवामानात मोठ्या बदल झाल्याचा पाहिला मिळत आहे. एका बाजूला काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे, तर काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. महाराष्ट्रात 1 मे पासून हवामानात मोठा बदल झालेला आहे नागरिकांना उन्हाच्या वाढत्या तापमानापासून दिलासा मिळाला आहे. परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी एक नव संकट उभा राहिला आहे. ते म्हणजे अवकाळी पाऊस या अवकाळी पावसाने पेरणीसाठी शेतीची मशागत करावी लागत होती. आता ती कोळंबली आहे. अचानक कुठेही मुसळधार पाऊस पडत आहे. IMD weather forecast

याच दरम्यान, हवामान खात्याने म्हणजेच IMD (India Meteorological Department) ने पुन्हा एकदा मोठा इशारा दिलेला आहे. तब्बल सात राज्यांना रेड अलर्ट करत महाराष्ट्रात देखील पावसाचा तडाका बसण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पावसाचे संकट मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे अचानक कुठेही मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.

तरी एकीकडे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राजस्थान मधील श्रीगंगानगर येथे तापमान 45°c वर पोहोचले असून, उन्हाचा कहर सुरूच आहे. नागरिकांना उकड्यापासून त्रास होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाची बातमी काही भागात दिलासा ठरू शकते परंतु काही राज्यांमध्ये मात्र याच पावसाने विनाश किंवा जीवितहानी होऊ शकते.

पूर्वोत्तर भारतामध्ये देखील पावसाचा जोर पाहिल्या मिळत आहे. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये IMD ने रेड अलर्ट जारी केला आहे. इथे पाऊस खूप जास्त झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आलेला आहे यामुळे दृश्यमानवतेवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

महाराष्ट्र बाबत बोलायचं झाल्यास, गेलं काही दिवसांपासून राज्यात वेगळच वातावरण निर्माण झालेला आहे अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच झोप उडाली आहे. शेतकऱ्यांनी देखील काही ठिकाणी पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी नाही अशा परिस्थितीमध्ये शेतीची मशागत करण्यास सुरुवात केलेली आहे. विदर्भ मराठवाडा कोकण आणि खानदेश परिसरात पावसाची स्थिती कायम आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशारा आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यामुळे शेती पिकांसाठी विभागांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे.

हवामान खात्याच्या या सतत बदलणाऱ्या अंदाजामुळे जनतेने नियमितपणे हवामान अंदाजाकडे लक्ष देऊन योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अवकाळी पावसाचा किंवा वादळी वारे, हे हवामानातील बदल आणि भविष्यात आणखी मोठा संकटांना निमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे हवामान खात्याचा इशाराकडे दुर्लक्ष न करता. आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षिता प्रथम लक्षात घ्यावी.

हे पण वाचा | PM किसान योजनेचे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

Leave a Comment

error: Content is protected !!