PM Kisan Beneficiary List 20th Installment : केंद्र शासनाकडून देशातील शेतकऱ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या पंतप्रधान किसन सन्मान निधी योजना ही गेल्या काही वर्षात लाखो शेतकऱ्यांसाठी आधार देणारे ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे त्या 20 व्या हप्त्याकडे, जो जून महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. PM Kisan Beneficiary List 20th Installment
31 मे पूर्वी करा हे काम
शेतकऱ्यांनी आपल्या नावाची खात्री करून घ्यावी लागणार आहे. कारण यंदा केंद्र सरकारने स्पष्ट सूचना दिले आहेत की, 31 मे 2025 पर्यंत eKYC आणि बँक खात्याशी आधार लिंक पूर्ण न झाल्यास हप्ता रोखला जाईल. यामुळे ज्यांनी अजून eKYC केली नाही, त्यांना हा हप्ता मिळणार नाही.
तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का? अशी करा ऑनलाईन तपासणी
- Pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर तिथं मुख्य पृष्ठावर लाभार्थी यादी(Beneficiary List) म्हणून पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
- नवीन विंडो उघडेल, त्यात तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा
- “Get Report” वर क्लिक करा
- तुमच्या गावातील संपूर्ण लाभार्थी यादी स्क्रीनवर दिसेल.
- त्या यादीत तुमचं नाव आहे का, ते तपासावा लागत आहे.
शेतकरी बांधवांनो जर तुम्ही शेतकरी असाल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा जर तुम्हाला वेळेवर हप्ता मिळाला नसेल तर शासनाने देखील नवीन निर्णय घेतलेला आहे हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना eKYC, आधार लिंक, आणि फार्मर ID ही डॉक्युमेंट लागणार आहे तरच तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील अन्यथा तुम्ही 20 व्या हप्त्यापासून मुकणार आहात.
हे पण वाचा | शेतकरी ओळखपत्र काढा तरच मिळणार पीएम किसान योजनेचे पैसे?