Maharashtra School : राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी शिक्षण विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून 2025 पासून सुरू होणार आहे आणि 16 जून रोजी प्रत्यक्षात शाळा सुरू होती. पण यंदाच्या शाळा सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली. ती म्हणजे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठपुस्तक मिळणार आहेत. Maharashtra School
हा निर्णय राज्यातील पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. कारण दरवर्षी अनेक शाळांमध्ये पुस्तके वेळेत मिळत नाही. त्यामुळे त्यांना सुरतीच्या काळामध्ये मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो पण यावर्षीही समस्या येणार नाही.
शिक्षण विभागाने आणली आहे खास योजना
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, शाळा सुरू होण्याच्या सात दिवसाआधीच मुख्याध्यापकांच्या ताब्यात पुस्तक पोहोचवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी अभ्यास सुरू करता येईल.
विदर्भातील शाळा थोड्या उशिराने सुरू होतील कारण तिथे जून महिन्यात तापमाना अधिक असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकाळच्या सत्रातच शाळा भरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
राज्यभरातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र 16 जून पासून शाळा सुरू होतील आणि पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केले जाईल. यासाठी विभागीय, तालुका आणि केंद्र स्तरावरती पुस्तकांच्या साठवणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या पुस्तकांच्या वाहतुकीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि जिल्हा व तालुका शिक्षण विभागामार्फत पार पडली जाणार आहे.
पहिल्याच दिवशी पुस्तक वाटप करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून नव्या अभ्यासक्रमाशी जोडणे, शाळेची उपस्थिती वाढवणे आणि शिक्षणात गळती रोखणे.
या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करताना पालक व अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
अनिल दूरदर्शनच्या उजळ भविष्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे आणि राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम आणि वेळेत सेवा पुरवणारे ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा | सहकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी असा करा अर्ज